Scorpio Horoscope Today 9 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे, त्यांना आज यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज मोठ-मोठ्या नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. आज नकारात्मक (Negative) गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि सकारात्मक (Positive) गोष्टींचा विचार करा. रागावर नियंत्रण आणि बोलण्यात गोडवा ठेवल्यास कामाच्या ठिकाणी सहकारी आणि वरिष्ठांचेही सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी (Education) जाऊ शकतात.


वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी मंगळवार खूप व्यस्त आणि तणावपूर्ण असेल. कामाच्या वेळी काही कामांमध्ये झपाट्याने यश मिळेल, तर काही कामात अडथळे येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. व्यवसायात (Business) आज कोणाचा तरी सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आज या राशीचे नोकरदार (Employees) लोक सहकार्‍यांच्या मदतीने इतर रोजगार शोधतील.


वृश्चिक राशीच्या लोकांचे आजचे कौटुंबिक जीवन


वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर दिवस चांगला आहे. कुटुंबात चांगले वातावरण राहील आणि जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आज जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कुटुंबासोबत संध्याकाळचा वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल.


आज वृश्चिक राशीचे आरोग्य


वृश्चिक राशीच्या लोकांना मानसिक तणावाची समस्या असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे नियमित तपासणी करत रहा. ध्यान आणि योगाभ्यास करत राहणे फायदेशीर ठरेल.


वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 


वृश्चिक राशीला शुभ फळ मिळण्यासाठी लाल रंगाचे कपडे परिधान करा. यासोबतच हनुमानाच्या मंदिरात जाऊन गूळ आणि हरभरा अर्पण करा.


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 9 May 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य