Scorpio Horoscope Today 23 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण अधिक राहील. आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढताना दिसेल. पालकांचे सहकार्य मिळेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा. आज अनावश्यक वादात पडू नका. राजकारणात (Politics) चांगली संधी आहे.  


वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फारसा उत्साहवर्धक दिसत नाही. आज तुम्ही समाधानी असाल की तुम्हाला जे काही मिळालं आहे ते देवाच्या कृपेने खूप आहे. मात्र खर्च वाढल्याने तुमच्या बजेटवर परिणाम होईल. व्यवसायात कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे मानसिक तणावही जाणवू शकतो. आज शक्य असल्यास गुंतवणुकीची योजना पुढे ढकलून दिवस संयमाने घालवा.


वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन


वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांची आज छोट्या छोट्या कारणावरून चिडचिड होईल. याचा परिणाम कौटुंबिक वातावरणावर होऊ शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून तणावही होऊ शकतो. संध्याकाळची वेळ चांगली जाईल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमात थोडा वेळ घालवा.


आज वृश्चिक राशीचे आरोग्य


आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीचा आजचा दिवस फारसा अनुकूल दिसत नाहीत. आज दिवसभर आळस राहील, शरीरात थकवा जाणवेल. स्नायूंमध्ये वेदना जाणवेल. अन्न आणि पेय संतुलित ठेवा आणि योग ध्यान करा. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांचे कामात मन रमणार नाही. यासाठी अनावश्यक वादात पडू नका. थोडा वेळ विश्रांती घ्या. 


वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय


मंगळ स्तोत्राचे पठण करा. आणि गरीब लोकांना वस्त्र तसेच अन्नदान करा. 


वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 


वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य