Sankashti Chaturthi 2026: "संकष्टी" म्हणजे संकटांचा नाश करणारी...आज ऑगस्ट महिन्यातील पहिली संकष्टी चतुर्थी असून हा दिवस भगवान श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेश...हे हिंदू धर्मातील सर्वप्रथम पूजले जाणारे, बुद्धी, विवेक, ज्ञान, समृद्धी आणि विघ्नहर्ता देवता मानले जातात. अशा या बाप्पाला समर्पित आजचा दिवस आहे, चांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे. कारण या दिवशी अत्यंत शुभ योगायोग जुळून आला आहे, जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, भाग्यशाली राशी, योग्य तिथी, चंद्रोदय वेळ, पूजेची पद्धत...
संकटांचा नाश करणारी... संकष्टी चतुर्थी...(Sankashti Chaturthi 2026)
हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार 2 ऑगस्ट 2026, रविवारी आलेली आषाढ कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी भगवान श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान गणेशाची भक्तिभावाने पूजा, उपवास आणि चंद्रदर्शन केल्याने जीवनातील अडथळे, संकटे दुःख दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे..
संकष्टी चतुर्थी तिथी (Sankashti Chaturthi 2026 Tithi)
मराठी दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 1 ऑगस्ट रोजी रात्री 11:07 वाजता सुरू होईल. चतुर्थी तिथी 2 ऑगस्ट रोजी रात्री 11:15 वाजता संपेल. म्हणून उदयतिथीनुसार, 2 ऑगस्टच्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4:47 ते पहाटे 5:31 पर्यंत असेल. सकाळचा संध्या मुहूर्त पहाटे 5:09 ते सकाळी 6:16 पर्यंत, तर अभिजीत मुहूर्त दुपारी 12:19 ते दुपारी 1:11 पर्यंत असेल.
संकष्टी चतुर्थी 2026 चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2026 Moon Rise)
धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय अपूर्ण आहे. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 9:37 वाजता होईल.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जुळले शुभ योग (Shubh Yog)
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर यावर्षी, संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, हा योग नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे निर्णय, खरेदी आणि शुभ कार्यांसाठी अनुकूल मानला जातो. यासोबतच आणखी एक शुभ योग बनला, जो म्हणजे रवि योग, जो अशुभ दोष कमी करणारा आणि यश, प्रतिष्ठा, आत्मविश्वास वाढवणारा शुभ योग मानला जातो. ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभ वेळ आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊया.
संकष्टी चतुर्थीचे महत्त्व
- भगवान गणेश हे विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.
- नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीसाठी गणेशपूजन शुभ मानले जाते.
- विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सौख्य, तर अविवाहितांना शुभ विवाहयोगासाठीही गणेशाची आराधना केली जाते.
- मनोकामना पूर्ण व्हावी आणि संकटांपासून संरक्षण मिळावे म्हणून अनेक भाविक हा उपवास करतात.
श्रीगणेशाच्या पूजेत काय अर्पण करावे?
- 21 दुर्वा
- लाल किंवा जास्वंदाचे फूल
- मोदक किंवा लाडू
- शेंदूर आणि अक्षता
- तुपाचा दिवा लावून "ॐ गं गणपतये नमः" या मंत्राचा जप करावा.
या दिवशी काय करावे?
सकाळी स्नान करून गणेशपूजन करावे.शक्य असल्यास दिवसभर उपवास ठेवावा.चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन श्रीगणेशाची आरती करून उपवास सोडावा.गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणेश चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते.
संकष्टी चतुर्थी: 'या' 5 राशींना भाग्य, धनलाभ आणि यशाचे संकेत
ज्योतिषशास्त्रानुसार, 2 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. भगवान श्रीगणेशाला समर्पित असलेला हा दिवस विघ्नांचा नाश, बुद्धी, यश आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी बनणारे शुभ योग काही राशींसाठी विशेष अनुकूल परिणाम देऊ शकतात.
वृषभ
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी आर्थिक लाभाचे योग मजबूत राहतील. रखडलेले पैसे मिळू शकतात. व्यवसायात नवीन संधी मिळतील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गणेशपूजनामुळे मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता वाढेल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीला करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. श्रीगणेशाच्या कृपेने आत्मविश्वास वाढेल.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीची निर्णयक्षमता वाढेल. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस शुभ राहू शकतो. अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
धनु
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीला भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. प्रवास आणि नवीन योजनांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत.
मकर
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीला मेहनतीचे फळ मिळण्याचा दिवस ठरू शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत प्रगती, नवीन जबाबदारी किंवा वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहील.
हेही वाचा :
August 2026 Horoscope: अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
