Sankashti Chaturthi 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 31 ऑगस्ट.. या महिन्याची शेवटची संकष्टी चतुर्थी आणि श्रावणी सोमवार असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. "संकष्टी" म्हणजे संकटांचा नाश करणारी...हा दिवस भगवान श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे. कारण या दिवशी अत्यंत शुभ असा योगायोग जुळून आला आहे, जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचे महत्त्व, भाग्यशाली राशी, योग्य तिथी, चंद्रोदय वेळ, पूजेची पद्धत...

Continues below advertisement

संकटांचा नाश करणारी... संकष्टी चतुर्थी...(Sankashti Chaturthi 2026)

हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित दिवस मानला जातो. हिंदू पंचांगानुसार  2 ऑगस्ट 2026, रविवारी आलेली श्रावण कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी भगवान श्रीगणेशाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान गणेशाची भक्तिभावाने पूजा, उपवास आणि चंद्रदर्शन केल्याने जीवनातील अडथळे, संकटे दुःख दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.. 

संकष्टी चतुर्थी तिथी आणि तिसरा श्रावणी सोमवार (Sankashti Chaturthi 2026 Tithi)

मराठी दिनदर्शिकेनुसार, आज 31 ऑगस्टच्या दिवशी संकष्टी चतुर्थी आणि तिसरा श्रावणी सोमवार असल्यामुळे गणपतीसोबत भगवान शंकराची उपासना करण्यासाठीही दिवस विशेष मानला जातो. 

Continues below advertisement
  • चतुर्थी तिथी सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8:50 वाजता सुरू होणार आहे.
  • चतुर्थी तिथी मंगळवार, 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:41 वाजता समाप्त होईल.
  • उदयतिथीनुसार, चतुर्थी तिथी 1 सप्टेंबर रोजी येत आहे.
  • मात्र, हेरंब संकष्टी चतुर्थीचा उपवास 31 ऑगस्ट रोजी पाळला जाणार आहे.
  • यामुळे 31 ऑगस्ट रोजी श्रावणी सोमवार आणि हेरंब संकष्टी चतुर्थी असा विशेष धार्मिक योगायोग निर्माण झाला आहे.

संकष्टी चतुर्थी 2026 चंद्रोदय वेळ (Sankashti Chaturthi 2026 Moon Rise)

धार्मिक मान्यतेनुसार, संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय अपूर्ण आहे. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 8:29 वाजता होईल.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

भगवान गणेश हे विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे.नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक प्रगतीसाठी गणेशपूजन शुभ मानले जाते.विवाहितांच्या वैवाहिक जीवनात सौख्य, तर अविवाहितांना शुभ विवाहयोगासाठीही गणेशाची आराधना केली जाते.मनोकामना पूर्ण व्हावी आणि संकटांपासून संरक्षण मिळावे म्हणून अनेक भाविक हा उपवास करतात.

श्रीगणेशाच्या पूजेत काय अर्पण करावे?

21 दुर्वालाल किंवा जास्वंदाचे फूलमोदक किंवा लाडूशेंदूर आणि अक्षतातुपाचा दिवा लावून "ॐ गं गणपतये नमः" या मंत्राचा जप करावा.

या दिवशी काय करावे?

सकाळी स्नान करून गणेशपूजन करावे.शक्य असल्यास दिवसभर उपवास ठेवावा.चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन श्रीगणेशाची आरती करून उपवास सोडावा.गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा गणेश चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते.

संकष्टी चतुर्थी: 31 ऑगस्ट 'या' 5 राशींना भाग्य, धनलाभ आणि यशाचे संकेत

ज्योतिषशास्त्रानुसार, 31 ऑगस्ट 2026 हा दिवस काही राशींसाठी करिअर, आर्थिक स्थिती, व्यवसाय आणि वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने सकारात्मक ठरू शकतो. 

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. एखादा व्यावसायिक किंवा नोकरीशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. तुमच्यातील आत्मविश्वास आणि काम करण्याची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक बाबतीत प्रगतीचे संकेत आहेत आणि रखडलेले एखादे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी परिस्थिती समजून घेणे फायदेशीर ठरेल. करिअरच्या दृष्टीने हा दिवस पुढील काळासाठी महत्त्वाची दिशा देऊ शकतो.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीसाठी कामाच्या ठिकाणी प्रगतीचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून एखाद्या कामात अडथळे येत असतील तर त्यावर तोडगा सापडू शकतो. वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत नवीन संधी समोर येऊ शकतात; मात्र कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी माहिती व्यवस्थित तपासणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधात संवाद सुधारण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलल्यास गैरसमज दूर होऊ शकतात. 

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. विशेषतः कर्ज किंवा जुन्या आर्थिक जबाबदाऱ्यांबाबत दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. नोकरी किंवा व्यवसायात केलेल्या प्रयत्नांना परिणाम मिळू शकतो. मात्र कामाच्या ठिकाणी टीमवर्कला महत्त्व देणे गरजेचे आहे. प्रत्येक गोष्ट स्वतः करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सहकाऱ्यांची मदत घेतल्यास काम अधिक सहज पूर्ण होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहू शकते, पण मनातील चिंता जास्त वाढू देऊ नका. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराकडून भावनिक आधार मिळण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी 31 ऑगस्ट हा दिवस विशेष अनुकूल मानला जात आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळू शकतात आणि एखादा महत्त्वाचा व्यवहार फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. नोकरीत नेतृत्वगुण दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ व्यक्तींसमोर तुमची क्षमता सिद्ध करण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढवण्याच्या संधी दिसत असल्या तरी विरोधक किंवा स्पर्धकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. प्रेमजीवनात आत्मविश्वास वाढेल आणि जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवता येईल. 

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काम आणि आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने चांगला राहू शकतो. वेळेचा योग्य उपयोग केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. नोकरीमध्ये एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल आणि त्याचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा व्यवहारातून फायदा मिळू शकतो. आर्थिक बाबतीत संधी उपलब्ध होतील, मात्र खर्च करताना विचार करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :

Hindu Religion: बाळाच्या जन्मानंतर 5 व्या दिवशी 'सटवाईची पूजा' का करतात? मुलांचे भाग्य लिहिणारी देवी नेमकी कोण? धार्मिक श्रद्धा, परंपरा...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)