Sankashti Chaturthi 2025: आज संकष्टी चतुर्थी आहे. भगवान गणेशाच्या भक्तांसाठी या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे, या दिवसाचा उपवास दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार जे लोक संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात आणि या दिवशी श्रीगणेशाची पूजा करतात, त्यांच्या कुटुंबात सुख-समृद्धी येते. विशेषत: महिला आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी हे व्रत करतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री करावयाच्या त्या खास उपायांबद्दल जाणून घेऊया, ज्यामुळे भगवान गणेशाच्या कृपेने भक्तांच्या अडचणी दूर होऊ शकतात. तसेच, त्यांना गणपतीकडून इच्छित वरही मिळू शकतो. शास्त्रात काय म्हटलंय? जाणून घ्या..
संकष्टी चतुर्थी तिथी
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावेळी माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 15 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11.52 वाजता सुरू होत आहे, जी दोन दिवसांनी 17 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 2:15 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीचे व्रत आज म्हणजेच 16 फेब्रुवारी 2025 रोजी करण्यात येणार आहे.
संकष्टी चतुर्थी व्रत-उपवास सोडण्याची योग्य वेळ
धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत म्हणजेच संपूर्ण दिवस असते. या उपवासात फक्त फळे आणि भाज्यांचे सेवन केले जाते. संध्याकाळी चंद्रदेवाची पूजा करून त्याला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला जातो. आज म्हणजेच 16 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:39 वाजता चंद्रोदय होण्याची शक्यता आहे.
संकष्टी चतुर्थी साठी 'असे' काही उपाय, ज्याने दु:ख होईल दूर!
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी - संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करण्यापूर्वी लाल रंगाचे वस्त्र घ्या. कपड्यात श्रीयंत्र आणि सुपारी ठेवा. आता हे बंडल गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवा. संध्याकाळच्या पूजेनंतर ते घराच्या तिजोरीत ठेवा. या उपायाने तुम्हाला श्रीगणेशाची तसेच देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होईल. तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल.
घरात सुख शांती राहण्यासाठी - जर तुम्हाला तुमच्या घरात सुख सदैव राहावे असे वाटत असेल तर द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला गणेशाची हिरवी मूर्ती स्थापित करा. मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिची पूजा करावी. तिळाचे लाडू, लाल फुले, गूळ, कुंकू, तांदूळ, अष्टगंध, तांब्याच्या भांड्यात पाणी, केळी, मोदक आणि उदबत्ती श्रीगणेशाला अर्पण करा. या दरम्यान श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करावा. या उपायाने साधकाच्या घरात सकारात्मकता राहते आणि अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतात.
कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर - काही कारणास्तव तुमचे कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करावी. तसेच त्यांना रात्री 21 लाडू अर्पण करा. या दरम्यान ‘ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:’ या मंत्राचा 3 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील कमजोर ग्रहांची स्थिती मजबूत होईल. तसेच आर्थिक स्थिती मजबूत होईल.
हेही वाचा :
Astrology: कामापुरता मामा असतात 'या' 3 राशी? अत्यंत स्वार्थी, फायद्यासाठी मित्र बनवतात, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)