Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस. हिंदूधर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात संकष्टी तिथी येते.त्यानुसार, अश्विन कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आज आहे. ही संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) लाडक्या गणरायाला समर्पित आहे.कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधीवत पूजा केली जाते. गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं.
शुक्ल पक्षातील तिथी ही विनायकी चतुर्थी असते तर कृष्ण पक्षातील तिथी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी चतुर्थी तिथीचं व्रत करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने भक्तांना सुख-सौभाग्य प्राप्त होते. तसेच, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यानुसार, आजच्या संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त नेमका कोणता, पूजेची पद्धत कशी असणार? या संदर्भात अधिक जाणून घेऊयात.
आज संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त (Sankashti Chaturthi Shubh Muhurta 2024)
हिंदू पंचांगानुसार, कृष्ण पक्षातील तिथी ही गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने भक्तांना पुण्य फळ मिळतं. त्यानुसार आज म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024 रोजी संकष्ट चतुर्थी तिथी आहे. संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त सकाळी 06 वाजून 46 मिनिटांनी सुरु झाला आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 04 वाजून 16 मिनिटांनी हे व्रत संपेल.या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 07 वाजून 54 मिनिटांनी असणार आहे.
संकष्ट चतुर्थी पूजा विधी (Sankashti Chaturthi Puja Vidhi 2024)
- संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करा आणि सूर्याला जल अर्पण करा.
- त्यानंतर, घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो लावा.
- विधीनुसार, गणेशाला जल अर्पण करा.
- त्यानंतर, गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घाला. आणि कुंकू लावा.
- तसेच, या दिवशी घरात घरात बनवलेले गोडाधोडाचे पदार्थ जसे की, मिठाई, मोदक असा प्रसाद चढवा.
- देवाच्या फोटोसमोर दुर्वा ठेवा. यशप्राप्तीसाठी आणि प्रगतीसाठी गणपतीला 11 दुर्वांच्या जुड्या अर्पण करा. अथर्वशीर्षाचे पठण करावे. तसेच मनोभावे श्रवण करावे.
- देवाची मनोभावे आरती करा.
- पूजा झाल्यानंतर भक्तांमध्ये हा प्रसाद वाटा. गणपतीची आरती म्हणून नैवेद्य अर्पण करा. गरजू आणि गरीबांना अन्नदान करा असे केल्याने आर्थिक संकटांपासून सुटका होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :