Sankashti Chaturthi 2024:  हिंदू धर्मशस्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला (Sankashti Chaturthi) मनोभावे पुजा केल्या  श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवार 28  मार्च रोजी आहे.  रात्री 9.04 वाजता चंद्रोदय होईल. चतुर्थीला चंद्राची पूजा करतात, त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. श्रीगणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते.


चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे.  महाराष्ट्रातील प्रत्येक घरात संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. मनोभावे हे व्रत केल्यास बाप्पा आपल्य सर्व मनोकामना पूर्ण करतात. मात्र कळत नकळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात. चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पहिजे या विषयी आपण जाणून घेणार आहे. 


चतुर्थीला चुकूनही करु नका 'या' गोष्टी



  • चतुर्थीच्या दिवशी कधीच  तुळस अर्पण करु नये

  • चतुर्थीच्या दिवशी कांदा, लसूण आणि मासांहार करू नये. गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे. ते भक्तांच्या धावेला लगेच धावून जातात. जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंड देखील लगेच करतात. 

  • चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे. चंद्राची पुजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही. चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करु नका.

  • चतुर्थीचा दिवशी कोणत्याही पशु- पक्ष्यांना छळू नये.

  • चतुर्थीच्या दिवशी आपल्या आई- वडिलांचा, मोठ्यांचा अपमान करु नये. त्यांचा आदर करावा.

  • खोटे बोलणे, लबाडपणा करणे या गोष्टी टाळले पाहिजे.


नंदीला द्या एक गोष्ट रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील 


गणपत्ती बाप्पा ही सर्वांचा आवडता देवता आहे. विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहे. सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पुजा केली पाहिजे. चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे, त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील. चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आण गुळ खाण्यासाठी दिल्याने आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका 'हे' पाच पदार्थ, अन्यथा मिळेल अनिष्ट फळ