Samsaptak Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, दोन शत्रू ग्रह जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळतो. सध्या सूर्य (Sun) आणि शनि (Shani Dev) एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. यामुळे एक शक्तिशाली योग (Yog) जुळून येणार आहे. या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रूत्व आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांमध्ये शत्रूत्व आणि मैत्रीचा भाव असतो. जेव्हा अशा ग्रहांचा संयोग जुळून येतो तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम पाहायला मिळतो. सध्या सूर्य आणि शनि या दोन शक्तिशाली ग्रहांचा मिळून समसप्तक योग जुळून येणार आहे. त्यामुळे 3 राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सूर्य ग्रह सध्या कन्या राशीत विराजमान आहे. तर, शनी मीन राशीत आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या सातव्या चरणात आहेत. शनि आणि सूर्य ग्रह मिळून समसप्तक योग निर्माण करतायत.सूर्य 17 ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत असणार आहे त्यानंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. हा योग फार प्रभावी असणार आहे तसेच, यामुळे कोणत्या राशींवर शुभ परिणाम होईल ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी समसप्तक योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. तुमच्या जीवनात चांगले बदल घडून येतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. धनसंपत्तीत वाढ झालेली दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी समसप्तक योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता दिसून येईल. त्याचबरोबर, कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, जर तुम्हाला या काळात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. हा काळ फार कष्टदायी मानला जातो. मात्र, सूर्य आणि शनिच्या समसप्तक योगामुळे मीन राशीसाठी हा काळ फार चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत वाढ झालेली दिसेल. तुमच्या जुन्या समस्या दूर होतील. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतील. नवीन गोष्टीदेखील शिकाल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)