Sagittarius Monthly Horoscope July 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना चांगला जाणार आहे. तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे व्यवसायात तुमची प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाचा अधिक ताण येऊ शकतो. मात्र, कामाच्या ठिकाणी असलेला तुमचा सकारातमक दृष्टिकोन तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल आहे. जुलैमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात.
ग्रहांचे धनु राशी परिवर्तन
7 जुलैपर्यंत सप्तम घरात भद्रा योग राहील, त्यामुळे या महिन्यात व्यवसायात नफा वाढेल. तसेच, व्यवसाय क्षेत्रातील तुमचा अनुभव यावेळी तुमच्या कामी येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. सातव्या घरातून शनीचा नववा-पंचम राजयोग राहील, त्यामुळे व्यवसायाची रणनीती आणि नेतृत्व तुमच्या व्यवसायात वाढ करेल. 7 जुलैपर्यंत सप्तम घरात आणि 17 ते 24 जुलैपर्यंत आठव्या घरात सूर्य-बुध संयोग असेल, ज्यामुळे तुमचा सकारात्मक दृष्टीकोन या महिन्यात तुमच्या कर्मचार्यांना खूप प्रभावित करेल.
धनु राशीचे करिअर कसे असेल?
1 जुलैपासून दशम घरात अशुभ स्थिती असेल, त्यामुळे नोकरीत अधिक कामाचा ताण येऊ शकतो. वाढलेल्या कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. दशम घराचा स्वामी बुध सप्तम घरात भद्रा योग तयार करेल, त्यामुळे या महिन्यात बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या प्रोफाईलनुसार नोकरी मिळू शकते. 17 ते 24 जुलै दरम्यान आठव्या भावात सूर्य-बुधाचा बुधादित्य योग आहे, ज्यामुळे तुम्ही व्यवसाय वाढीसाठी आणि अतिरिक्त उत्पन्नासाठी मित्राचं सहकार्य घेऊ शकता.
धनु राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?
7 जुलैपासून शुक्राचा सप्तम घराशी 3-11 चा संबंध असेल, त्यामुळे वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल आहे. सातव्या घरातून शनीचा नववा-पंचम रास योग असेल, त्यामुळे या महिन्यात कोणत्याही बाबतीत तुमच्या निर्णयाचे कुटुंबातील सदस्य जोरदार स्वागत करतील. 7 जुलैपर्यंत सप्तम भावात भद्रा योग असल्याने तुमच्या प्रेम जोडीदारासोबतचे नाते कमकुवत होऊ शकते.
धनु राशीचे करिअर कसे असेल?
पाचव्या घरात शनीच्या तिसर्या राशीमुळे तुम्हाला शैक्षणिक परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळेल फक्त तुमची मेहनत कमी पडू देऊ नका. 1 जुलैपासून मंगळाच्या पंचम घरातून नवम-पंचम राजयोग असेल, त्यामुळे अभियांत्रिकी, डिझायनिंग, भाषा, कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील.
धनु राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती
16 जुलैपर्यंत सहाव्या घरात अशुभ स्थिती असल्याने जुलैमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आठव्या घरात शनीचा षडाष्टक दोष असेल, त्यामुळे व्यवसायानिमित्त अगदीच महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :