Sagittarius Horoscope Today 20 November 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे तर विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाईल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. पण तुम्ही खूप मेहनत केली तरच यश मिळेल.  तुम्ही चांगल्या मार्कांनी पास होऊ शकता. आज संध्याकाळी तुमचा एक जुना मित्र तुम्हाला भेटायला येईल, त्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. महिलांबद्दल बोलायचे झाले तर,  निरुपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करू शकतात. पैशांचा जपून वापर करा.


तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे वाचवा आणि अनावश्यक खर्च करणे टाळा, अन्यथा तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त कामाच्या ताणामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवू शकतो. थकल्यासारखे वाटत असल्यास औषध घेणे आवश्यक आहे, अन्यथा, तुम्हाला ताप देखील येऊ शकतो. ज्या लोकांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.


घरी पाहुण्यांचं आगमन होणार


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक पाहुण्यांचे आगमन होईल. मित्रांबरोबर सहलीला जावे लागेल. मुला-मुलीशी संबंधित कोणतेही वाद मिटतील. आजचा दिवस गाण्यात आणि संगीताची आवड निर्माण करेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीतून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. 


आज धनु राशीचे आरोग्य 


आज तुम्हाला सांधेदुखीचा दिर्घकालीन आजार पुन्हा त्रास देऊ शकतो. यासाठी तुमच्या आरोग्याकडे हलगर्जीपणा करू नका. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.   


धनु राशीसाठी आजचे उपाय 


धनु राशीच्या लोकांनी हनुमान चालिसाचे पठण करावे. तसेच, गरजूंना दान करावे.  


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Weekly horoscope 20 to 26 November 2023 : मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या