Sagittarius Horoscope Today 16 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. आज कुटुंबातील (Family) सदस्यांबरोबर वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिका. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही आधी केलेल्या गुंतवणुकीचा (Investment) तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या व्यक्तींशी बोलाल. विद्यार्थ्यांना (Students) परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी मिळेल. नोकरीत (Job) अडकलेले पैसे मिळतील. हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. राजकारणात चांगली संधी आहे.


अनुभवी लोकांचा सल्ला घ्या 


कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशांचा जपून वापर करा. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. तसेच, आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. पण, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 


धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, धनु राशीच्या लोकांना नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलाच्या बाजूने ज्या काही चिंता होत्या, त्या आज दूर केल्या जातील. मित्रांसोबतच्या संभाषणातून नवीन माहिती मिळेल आणि शेजाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. संध्याकाळी काही आध्यात्मिक लोकांशी भेटीगाठी होतील. 


धनु राशीचे आजचे आरोग्य


धनु राशीच्या लोकांना डोकेदुखी किंवा मायग्रेन इत्यादी समस्या असू शकतात. अत्यंत रागाची स्थिती टाळा आणि मन शांत ठेवून काम करा. दररोज सकाळी पश्चिमोत्तनासन करणे तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरेल.


धनु राशीसाठी आजचे उपाय 


व्यावसायिक प्रगतीसाठी शिवलिंगाला दूध अर्पण करा. नंतर तांब्याच्या भांड्यात थोडे भरून ओम नमः शिवाय असे म्हणत व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडा.


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 16 June 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य