Shakun Shastra : घरात मुंग्या असणे याच्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुंग्या खाण्याच्या पदार्थात पडू नये एवढीत आपण काळजी घेतो. परंतु, शकून शास्त्रात घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ याबाबत सांगितलं आहे. घरातून मुंग्या बाहेर पडणे हे शुभ आणि अशुभ संकेतांशी संबंधित आहे. सहसा काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या अनेक घरांमध्ये दिसतात. जर तुमच्या घरातही अशा मुंग्या दिसत असतील तर त्याला अनावश्यक समजू नका. शकुन शास्त्रामध्ये या दोन रंगांच्या मुंग्यांबद्दल सांगितले आहे. ज्यांच्याशी शुभ आणि अशुभ संकेत जोडलेले आहेत. 


Shakun Shastra : काळ्या मुंग्यांचे संकेत


शकुन शास्त्रात घरात मुंग्या दिसल्यानंतर मिळणाऱ्या संकेतांबद्दल माहिदी देण्यात आलीय. शकुन शास्त्रात सांगितल्याप्रमाणे काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात. जर काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरातून बाहेर पडत असतील तर हे लक्षण मानले जाते की घरात सुख-समृद्धी येणार आहे. यासोबतच तुमचे शारीरिक सुख वाढणार आहे हे देखील एक शुभ लक्षण आहे. 
कोणत्याही धान्यात काळी मुंगी दिसली तर ती अधिक शुभ मानली जाते. घरी काळ्या मुंग्या दिसल्यास त्यांना साखर किंवा मैदा वगैरे खायला द्यावे.


कुन शास्त्रामध्ये घरामध्ये लाल मुंग्या बाहेर येणे अशुभ मानले जाते. हे घरात येणाऱ्या संकटांचे लक्षण मानले जाते. जर घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या येत असतील तर हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल तसेच आर्थिक खर्चही वाढू शकतो.


शकुन शास्त्रानुसार मुंग्यांची शुभ आणि अशुभ दिशा


जर काळ्या मुंग्या उत्तर दिशेकडून आल्या तर ते खूप शुभ मानले जाते. 


दुसरीकडे लाल मुंग्या पूर्वेकडून आल्या तर ते अशुभ मानले जाते. 


पश्चिमेकडून लाल मुंग्या येणे शुभ असते. हे एक संकेत आहे की तुम्ही प्रवासासाठी जाऊ शकता.


मुंग्या वरून खाली येणे देखील शुभ मानले जाते. 


दुसरीकडे, जर मुंग्या खालून वर जात असतील तर  जीवनात प्रगतीचे लक्षण मानले जाते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


Garuda Purana : मृत्यूपूर्वी प्रत्येक व्यक्तीला दिसतात 'हे' सहा संकेत