Ravi Pradosh Vrat 2023 : धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रत हे भगवान शंकराला (Shiva) समर्पित आहे. आज रविवार, 10 डिसेंबर रोजी प्रदोष व्रत आहे. या तिथीला प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा केली जाते. रविवारी हे व्रत येत असल्याने याला रवि प्रदोष व्रत म्हणतात. मान्यतेनुसार वारानुसार प्रदोष व्रताचे नाव ठरते. त्यानुसार, रविवार 10 डिसेंबर रोजी प्रदोष व्रत आहे. रविवारी हे व्रत येत असल्याने याला रवि प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष व्रतात भगवान शंकराची विधिवत पूजा केल्याने विशेष लाभ होतो.


मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील हे प्रदोष व्रत आहे. प्रदोष काळ सूर्यास्ताच्या 45 मिनिटे आधी सुरू होतो आणि सूर्यास्तानंतर 45 मिनिटांपर्यंत असतो. रवि प्रदोष व्रत केल्याने दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. प्रदोषाच्या दिवशी सोपे उपाय करून तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता. त्यानुसार जाणून घेऊया रवि प्रदोष व्रताची पूजाविधी आणि उपाय.


रवि प्रदोष व्रत 2023 मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी तिथीची शुभ वेळ



  • कृष्ण त्रयोदशी तिथीची समाप्ती सुरुवात: 10 डिसेंबर, सकाळी 07:13

  • कृष्ण त्रयोदशी तिथीची समाप्ती: 11 डिसेंबर, सकाळी 07:10

  • रवि प्रदोष पूजेची वेळ: 10 डिसेंबर, संध्याकाळी 05:25 पासून रात्री 08:08 पर्यंत


रवि प्रदोष व्रत आणि पूजाविधी



  • प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठले पाहिजे.

  • सकाळी दैनंदिन कामे उरकून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावेत.

  • त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे, कारण रविवारी सूर्याची पूजा केल्याने करिअरमध्ये प्रगती होते.

  • त्यानंतर रवि प्रदोष व्रत आणि शंकराची पूजा करा.

  • दिवसभर फळांचा आहार करुन ब्रह्मचर्चेचे नियम पाळा. दुपारी झोपू नका.

  • संध्याकाळी सूर्यास्तानंतर शिवमंदिरात जावं किंवा घरी शंकराची पूजा करावी.

  • शुभसमयी शिवलिंगाला गंगाजल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करावा.

  • त्यानंतर भगवान शंकराला अक्षत, फुले, फळे, साखर, मध, धूप, दिवा, नैवेद्य इत्यादी अर्पण करा.

  • पूजेदरम्यान 'ओम नमः शिवाय' मंत्राचा जप करा आणि प्रदोष व्रताची कथा ऐका.

  • शेवटी भगवान महादेवाची आरती करून पूजा पूर्ण करा.

  • मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा.


प्रदोष व्रताचे महत्त्व


धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रत केल्याने दोन गायींचे दान केल्या इतके पुण्य लाभते. या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मृत्यूनंतर त्याला स्वर्ग प्राप्ती होते, असे मानले जाते. रवि प्रदोष व्रत हे आरोग्यासाठी देखील अत्यंत लाभदायक आहे. रवि प्रदोष व्रत केल्याने दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते.


रवि प्रदोष व्रताचे उपाय


1. रवि प्रदोष पूजेच्या वेळी बेलपत्रावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे. अशी 3 बेलपत्राची पानं भगवान शंकराला अर्पण करा. पूजा संपल्यानंतर ती बेलपत्रं पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावीत. हा उपाय केल्यास पैशाची कमतरता दूर होईल. आर्थिक बाजू मजबूत राहील.


2. प्रदोष व्रताच्या पूजेच्या वेळी शिवाला जल अर्पण करा आणि धोतरा अर्पण करा. शिवलिंगाचे पाणी ज्या बाजूला पडते त्या बाजूला धोतऱ्याचा देठ असावा. पूजा संपल्यानंतर तो धोतरा फूल कापडात बांधून तिजोरीत ठेवावा. या उपायाने तुमचे धन वाढेल.


3. रवि प्रदोष पूजा केल्यानंतर गरीब ब्राह्मणाला जव दान करा. हा उपाय केल्याने तुमच्या संपत्तीत वाढ होईल. जव दान केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Kuldeepak Rajyog 2023: तब्बल 500 वर्षांनंतर बनतोय कुलदीपक राजयोग; 'या' राशीच्या लोकांना करणार मालामाल