Rakshabandhan 2025: रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या निमित्ताने आतापासूनच विविध राख्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा 2025 वर्षात हा सण 9 ऑगस्ट रोजी येत आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांना राख्या बांधतात आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांचे रक्षण करण्याचे वचन घेतात. राखी ही केवळ एक धागा नाही, तर भावा-बहिणीच्या नात्यातील शुद्धतेचे प्रतीक आहे. सध्या रक्षाबंधननिमित्त राख्यांचा ट्रेंड सुरू आहे. मात्र जर शास्त्रानुसार बोलायचं झालं तर अशा काही राख्या आहेत ज्या बहिणींनी आपल्या भावाला चुकूनही बांधू नयेत. अशा राख्या बांधल्याने भावाचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या राख्या भावाला बांधू नयेत?
राखी निवडताना 'ही' खबरदारी घेणे महत्वाचे
रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे, जो प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे बंधन आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि आपल्या भावासाठी दीर्घायुष्य, आनंद आणि समृद्धीची कामना करतात. तसेच भावांकडून रक्षण करण्याचे वचन घेतात. मात्र शास्त्रानुसार बोलायचं झालं तर, या दिवशी राखी निवडताना काही खबरदारी घेणे महत्वाचे आहे, कारण चुकीची राखी निवडल्याने याचा परिणाम केवळ परंपरेवर होत नाही तर तुमच्या भावावर नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ परिणाम देखील होऊ शकतात.
रक्षाबंधनाच्या दिवशी कोणत्या राख्या बांधणे टाळाव्यात?
ब्रेसलेट राखी
आजकाल फॅशनच्या नावाखाली बाजारात ब्रेसलेटसारख्या राख्या विकल्या जात आहेत, ज्यामध्ये चमकदार धातू, प्लास्टिकचे मणी किंवा इतर आधुनिक डिझाइन असतात. या राख्या दिसायला आकर्षक असू शकतात, परंतु रक्षाबंधनाच्या परंपरेत त्यांचे विशेष महत्त्व नाही. राखीचे धार्मिक, भावनिक महत्त्व साधेपणा आणि शुद्धतेचे प्रतीक असलेल्या पवित्र धाग्याशी जोडलेले आहे. ब्रेसलेटसारख्या राख्या फक्त सजावटीच्या असतात. त्या रक्षासूत्राच्या पद्धतीने बांधता येत नाहीत.
देवी-देवतांचे चित्र असलेल्या राख्या
अनेकदा लोक देवदेवतांचे चित्र किंवा प्रतीक असलेल्या राख्या खरेदी करतात. शास्त्रानुसार, अशा राख्या भावाला चुकूनही बांधू नयेत. याचे कारण असे आहे की माणूस नेहमीच शुद्ध राहू शकत नाही. अशा परिस्थितीत देवाच्या चित्रासह राखी बांधणे योग्य मानले जात नाही. हे देवाचा अपमान आहे आणि भावावर नकारात्मक परिणाम करू शकते.
Evil Eye ची राखी
वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी 'एविल आय'(Evil Eye) डिझाइन केलेल्या राख्या देखील बाजारात उपलब्ध आहेत, खास रक्षाबंधनसाठी त्या खरेदी करतात, ज्यावर निळा मणी किंवा वाईट नजरेपासून बचाव करण्याचे प्रतीक असते. भावाचे रक्षण करण्याचा हेतू असला तरी, अशी राखी बांधणे शुभ मानले जात नाही. प्रत्यक्षात ती सैतानाची नजर मानली जाते, जी नकारात्मक ऊर्जा आहे. त्याऐवजी, तुम्ही रुद्राक्ष इत्यादी बांधू शकता.
राखीचा रंग देखील महत्त्वाचा
शास्त्रानुसार बोलायचं झालं तर रक्षाबंधनच्या दिवशी भावाला जी राखी बांधणार, त्या राखीचा रंग देखील खूप महत्त्वाचा आहे. काळा रंग जरी स्टायलिश दिसत असला तरी तो शुभ प्रसंगी चांगला मानला जात नाही. हिंदू धर्मात, काळा रंग नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभतेचे प्रतीक मानला जातो. रक्षाबंधन सारख्या पवित्र प्रसंगी काळ्या रंगाची राखी बांधल्याने भावावर अशुभ परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी, लाल, पिवळा, केशर किंवा हिरवा अशा शुभ रंगांच्या राख्या निवडा, जे सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक आहेत.
प्लास्टिक किंवा कृत्रिम पदार्थांपासून बनवलेल्या राख्या
बाजारात प्लास्टिक किंवा कृत्रिम पदार्थांपासून बनवलेल्या राख्या देखील विकल्या जातात. त्या सुंदर दिसू शकतात, पण त्यांचा सकारात्मक परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत अशा राख्या बांधणे टाळावे. पारंपारिकपणे, राखी रेशीम, कापसाच्या धाग्यापासून किंवा नैसर्गिक पदार्थांपासून बनवल्या जातात, जे पर्यावरणपूरक तसेच शुद्धतेचे प्रतीक आहे. प्लास्टिकची राखी बांधल्याने केवळ पर्यावरणाला हानी पोहोचत नाही तर भावावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
राखी निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- राखी निवडताना साधेपणाला प्राधान्य द्या.
- रेशीम किंवा कापसाच्या धाग्यापासून बनवलेली राखी सर्वोत्तम मानली जाते.
- राखीमध्ये ओम, स्वस्तिक, रुद्राक्ष किंवा शुभ रत्ने वापरा, जे सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात.
- लाल, पिवळा, हिरवा किंवा केशर असे रंग निवडा, जे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहेत.
- राखी ही केवळ एक धागा नाही, तर भावा-बहिणीच्या नात्यातील शुद्धतेचे प्रतीक आहे. ती निवडताना, मनापासून विचार करा आणि प्रेमाने बांधा.
हेही वाचा :
Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)