Raksha Bandhan 2025 : हिंदू पंचांगानुसार, ऑगस्ट (August) महिन्याला सुरुवात झाली आहे. याच महिन्यात भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंंधनचा (Raksha Bandhan) सणदेखील साजरा केला जातो. त्यानुसार, यंदा 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन साजरी केली जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचा रंग देखील विशेष महत्त्वाचा मानला जातो. योग्य रंगाची राखी बांधल्याने भावाच्या जीवनात धन, संपत्ती, आरोग्य, आयुष्यवृद्धी आणि सौख्य येते असे मानले जाते. याच संदर्भात सविस्तर माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांच्याकडून जाणून घेऊयात. 

राखीचे रंग आणि त्याचे फायदे :

1. पिवळ्या रंगाची राखी (गुरुचा रंग)

फायदा: बुद्धी, यश, समृद्धी, शुभताबहिणीने भावाला हा रंग बांधल्यास त्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाची वृद्धी होते.

2. हिरव्या रंगाची राखी (बुधाचा रंग)

फायदा: आरोग्य, शांतता, संवाद कौशल्यहा रंग भावाच्या आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. व्यापारी भावांसाठी विशेष शुभ.

3. लाल किंवा केशरी रंगाची राखी (मंगळ व सूर्याचा रंग)

फायदा: उर्जावान जीवन, आत्मविश्वास, संकटापासून संरक्षणहा रंग भावाला शौर्य, आत्मविश्वास देतो आणि दुष्ट नजरेपासून वाचवतो.

4. पांढऱ्या रंगाची राखी (चंद्राचा रंग)

फायदा: मानसिक शांती, सौम्यता, प्रेमभावनाबहीण-भावाच्या नात्यात प्रेम आणि समज वाढवण्यासाठी उपयुक्त.

5. सोनेरी किंवा झळाळती राखी (लक्ष्मीशी संबंधित)

फायदा: धनप्राप्ती, लक्ष्मी कृपा, वैभवबहिणीने सोनसळी रंगाची राखी बांधल्यास भावाच्या जीवनात लक्ष्मीचा वास राहतो.

विशेष मंत्र राखी बांधताना हा जप करा :

“रक्षाबंधनं शुभं भवतु, भ्रातृ आयुष्यमस्तु मे।सर्वसंपत्तिं मे देहि, सौख्यं आरोग्यमेव च॥”

सल्ला :

बहिणीने भावाच्या राशीप्रमाणे किंवा उद्दिष्टप्रमाणे राखी निवडावी.उदा. धन हवे असल्यास – सोनेरी रंगाची राखी निवडावी. आरोग्य हवे असल्यास – हिरव्या रंगाची राखी निवडावी.शांतता हवी असल्यास – पांढऱ्या रंगाची राखी निवडावी.

- डॉ. भूषण ज्योतिर्विद

हेही वाचा :     

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य