Raksha Bandhan 2025 : धार्मिक शास्त्रानुसार, भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण जवळ आला आहे. येत्या 9 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच उद्या रक्षाबंधनाचा सण देशभरात साजरा होणार आहे. या निमित्ताने बाजारात सगळीकडे राखी, भेटवस्तू खरेदीची रेलचेल पाहायला मिळतेय. मात्र, भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नेमका तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आत्ताच जाणून घ्या. 

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 2025 (Raksha Bandhan Shubh Muhurta 2025)

पंचांगानुसार, 9 ऑगस्ट रोजी पहाटे सूर्योदयापासून साधारण साडेसात तासांचा काळ शुभ मानला जातोय. या दिवशी सूर्योदय सकाळी 5:47 वाजता होईल. तसेच, पौर्णिमा तिथी दुपारी 1.25 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही भावाला राखी बांधू शकतात. 

भद्राचं सावट असणार की नाही? 

वैदिक पंचागानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राचं सावट आहे की नाही हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण या काळात अनेक अशुभ घटना घडतात. त्यामुळेच याबाबत अनेकदा चिंता असते. मात्र, यंदा भद्रकाळाचं कोणतंही सावट नसणार आहे. याचाच अर्थ सण साजरा करताना कोणत्याही प्रकारचे अडथळे येणार नाहीत. त्यामुळे बहि‍णींनी चिंता करण्याची गरज नाही. 

'या' खास योगात साजरा होणार रक्षाबंधन 

शास्त्रानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला म्हणजेच, 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 13 मिनिटांपासून रक्षाबंधनच्या पर्वाला सुरुवात होतेय. मात्र, उदय तिथीनुसार, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे. हे दोन्ही योग 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजून 24 मिनिटांपर्यंत हा शुभ योग असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Numerology : 'भोला भाला सा, सीधा साधा सा'....'या' जन्मतारखेचे लोक असतात फारच साधेभोळे; कोणीही सहज दुखवू शकतं, प्रेमातही कन्फ्युजन