Raksha Bandhan 2025: अवघ्या काही दिवसांतच रक्षाबंधन सण येतोय. हिंदू धर्मात या सणाला मोठे महत्त्व आहे. हा सण भाऊ आणि बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो, हा सण तसा प्रत्येकासाठी आहे. मात्र काही बहिणी अशा आहेत, ज्यांना भाऊ नाही, किंवा काही लोकांना तर भावंडच नाहीत, ते एकुलते एक असतात, अशात हा सण कसा साजरा करावा? हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. मग ज्या बहिणीला भाऊ नसेल ती तिच्या बहिणीला राखी बांधते, किंवा कोणी आपल्या चुलत भावंडांना किंवा मानलेल्या भावंडांना राखी बांधतात. पण असे करणे कितपत योग्य आहे? शास्त्रात रक्षाबंधनाचा खरा अर्थ काय सांगितला आहे, ते जाणून घेऊया..
रक्षाबंधन - भाऊ-बहिणीमधील अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक
रक्षाबंधनाचा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक करतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावतात, आऱती करतात आणि त्याच्या मनगटावर राखी बांधतात, ज्याच्या बदल्यात भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतो. पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की ज्यांना भाऊ नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा? त्या आपल्या बहिणीला राखी बांधू शकतात का? बहिणी एकमेकांना राखी का बांधू शकतात? आणि ज्यांना बहीण किंवा भाऊ नाही त्यांनी हा सण कसा साजरा करावा? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत...
भाऊ नसेल तर बहिण बहिणीलाही राखी बांधू शकते का?
रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी शास्त्रांमध्ये कोणतेही कठोर नियम नाहीत. बहीण फक्त तिच्या भावाला राखी बांधू शकते असेही काहीच नाही. हा सण प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक आहे, ज्याची भावना प्रत्येक नात्यात आवश्यक असते. ज्यांना भाऊ नाही ते त्यांच्या बहिणीला राखी बांधू शकतात. त्याचप्रमाणे बहिणी सुद्धा एकमेकांना राखी बांधू शकतात. यामुळे त्यांचे नाते मजबूत होईलच, शिवाय या सणाची खरी भावनाही टिकून राहील.
एकुलत्या एक मुलांनी कसा सण साजरा करावा?
दुसरीकडे, ज्यांची एकटी मुले आहेत, ते त्यांच्या मित्राला, शेजारीला किंवा ओळखीच्या व्यक्तीलाही राखी बांधू शकतात. परंतु राखी फक्त त्या व्यक्तीलाच बांधली पाहिजे ज्याला तुम्ही स्पष्टपणे तुमचा भाऊ म्हणून स्वीकारता. तुम्ही कधीही फक्त दाखवण्यासाठी किंवा कोणाच्या आग्रहाखातर कोणालाही राखी बांधू नये. यामुळे पाप होऊ शकते.
बहिणीला राखी बांधण्याचे नियम
- जर बहिणीला राखी बांधायची असेल, तर विवाहित बहिणींच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी.
- अविवाहित बहिणीच्या डाव्या मनगटावर राखी बांधणे अधिक शुभ असते.
- राखी बांधताना बहिणींनी साडीच्या पदराने, रुमालाने किंवा ओढणीने डोके झाकावे.
- राखी बांधताना बहिणीचा चेहरा पूर्वेकडे असावा. तर राखी बांधणाऱ्या बहिणीने पश्चिमेकडे तोंड करावे.
- अनामिका बोटाने दोन्ही भुवयांच्या मध्ये असलेल्या अज्ञ चक्रावर कुंकूने टिळा लावावा.
- टिळा लावल्यानंतर तांदळाचे दाणे लावावेत आणि पांढरी मिठाई खाऊ घालावी.
- बहिणीची आरती करावी आणि तिच्या दीर्घायुष्याची कामना करावी.
- त्या बदल्यात बहिणीला काही भेटवस्तू द्यावी.
हेही वाचा :
Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी का जाऊ नये? देवी लक्ष्मीशी संबंधित पौराणिक कथा, शास्त्रांत सांगितलेलं कारण जाणून व्हाल थक्क
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)