Raksha Bandhan 2025 : हिंदू धर्मग्रंथांनुसार, रक्षाबंधन हा फक्त भावाला राखी बांधण्याचा सण नाही. तर, भावा-बहिणीचं नातं अधिक घट्ट करण्याची ही एक चांगली सुवर्णसंधीच आहे. यंदा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी सगळीकडेच फार आनंदाचं वातावरण असते. मात्र, अशा वेळी तुमच्या छोट्या चुकाही तुम्हाला महागात पडू शकतात. त्यामुळे या ठिकाणी रक्षाबंधनच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

भेदभाव करु नका

रक्षाबंधनच्या दिवशी जर तुमच्या घरात एकापेक्षा जास्त भाऊ असतील. तर त्यांच्यात भेदभाव करु नका. सर्वांशी समान व्यवहार ठेवा. कारण भावा-बहिणीत तुलना केल्यास नात्यात कटुता निर्माण होते.

भेटवस्तूप्रती लालचीपणा दाखवू नका

रक्षाबंधनला मिळालेली भेटवस्तू छोटी असो किंवा मोठी ती प्रेमानेच दिलेली असते. त्यामुळे रक्षाबंधनला महागडं गिफ्ट मिळेल या उद्देशाने भावाला राखी बांधू नका. नात्यात पैशांना नाही तर भावनांना किंमत असते.

जुन्या गोष्टी बाहेर काढू नका

जर तुमच्या भावाबरोबर भूतकाळात काही वाद झाले असतील तर ते पुन्हा पुन्हा काढू नका. रक्षाबंधन हा जुन्या चुका माफ करण्याचा आणि नवीन नाती जोडण्याचा सण आहे.

एकत्र वेळ घालवा

आजकालच्या धावपळीच्या जगात नात्यांना वेळ देणं फार कठीण झालं आहे. अशा वेळी रक्षाबंधनच्या दिवशी भावाला फक्त राखीच बांधू नका तर छान वेळही घालवा. जुन्या आठवणी ताज्या करा. यामुळे तुमचं नातं अधिक घट्ट होईल.

नात्यांना हलक्यात घेऊ नका

भावा-बहिणीचं नातं फार अनमोल असतं. अनेकदा आपण त्यांना हलक्यात घेतो. आणि नात्याचं महत्त्व विसरतो. अशा वेळी फक्त एकाच दिवसासाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक दिवशी नात्याचं महत्त्व जाणा. भावा-बहिणीला पुरेसा वेळ द्या.

ईर्ष्या करु नका

अनेकदा भावा-बहिणीच्या नात्यात अभ्यास, नोकरी किंवा वैयक्तिक आयुष्याला घेऊन कळत नकळतपणे तुलना केल्या जातात. यामुळे ईर्ष्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी अशा गोष्टींपासून दूरच राहा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                  

Numerology : लग्नसंस्था, नको गं बाई! लग्नाच्या नावानेच दूर पळतात 'या' जन्मतारखेचे लोक; कितीही मागे लागा, शेवटी आपलंच करतात खरं