Color of Rakhi According to Zodiac Sign : श्रावण महिना जसा जवळ येतो तसे रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक होण्यास सुरूवात झाली आहे. या वर्षी 11ऑगस्टला रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाला राशीनुसार राखीचा रंग निवडणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला राशीनुसार तुमच्या भावांना कोणत्या रंगाची राखी बांधली पाहिजे हे सांगणार आहोत.
राशीनुसार या रंगांची राखी बांधा (Rakhi Colour According To Zodiac Sign)
मेष - मेष राशीच्या व्यक्तींना लाल रंगाची राखी बांधा. त्यामुळे आरोग्य चांगले राहते
वृषभ - या राशीच्या भावांना पांढऱ्या रंगाची राखी बांधा त्यामुळे मानसिक शांती मिळते
मिथुन - या राशीच्या व्यक्तींना हिरव्या रंगाची राखी बांधा. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तसेच अडकलेली कामे पूर्ण होतील
कर्क - या राशीच्या भावांना पिवळ्या रंगाचा धागा असणारी राखी बांधा. यामुळे भावांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल तसेच नात्यातील विश्वास वाढेल
सिंह - सिंह राशीच्या लोकांना पाच रंगाचा धागा असणारी राखी बांधा. असे केल्यास भावांच्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदेल
कन्या - कन्या राशीच्या भावांना पांढऱ्या किंवा सिल्वहर रंगाची राखी बांधा. त्यामुळे जीवनात येणारे अडथळे दूर होतील.
तूळ- या राशीच्या व्यक्तींना गुलाबी किंवा लाल रंगाची राखी बांधा. यामुळे समृद्धी लाभेल
वृश्चिक - या राशीच्या व्यक्तींना गुलाबी आणि लाल रंगाचा धागा असलेली राखी बांधा.
धनु - धनु राशीच्या पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा धागा असलेली राखी बांधा. यामुळे मानसिक शांती मिळते तसेच नोकरी आणि व्यापारात प्रगती मिळते
मकर - या राशीच्या भावांना मल्टीकलर राखी किंवा निळ्या रंगाची राखी बांधा.
कुंभ - या राशीच्या भावांना निळ्या रंगाची राखी बांधा. जीवनातील सगळे संकटे दूर होतील
मीन - या राशीच्या भावांना लाल, पिवळ्या, नारंगी रंगाची राखी बांधा. त्यामुळे भावांच्या जीवनात सुख येईल
रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 11 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु होणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)