Rajyog Diwali 2025 : दिवाळीला तब्बल 100 वर्षांनी जुळून येतोय राजयोग; 3 राशींना अचानक होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
Rajyog Diwali 2025 : दिवाळीच्या या दिवशी गुरु ग्रह आपल्या उच्च राशीत म्हमजेच कर्क राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण आणि हंस राजयोग निर्माण होणार आहे.

Rajyog Diwali 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सणसमारंभाच्या वेळी ग्रह संक्रमण करुन अनेक शुभ आणि राजयोग (Rajyog) निर्माण करतात. यंदा दिवाळीचा सण 20 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होतोय. दिवाळीच्या (Diwali 2025) या दिवशी गुरु ग्रह आपल्या उच्च राशीत म्हमजेच कर्क राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे केंद्र त्रिकोण आणि हंस राजयोग निर्माण होणार आहे. अशातच राजयोग जुळून आल्याने काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशींना अचानक धनलाभ होणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या प्रथम चरणात हा राजयोग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, गुरु आपल्या राशीच्या सहाव्या आणि भाग्य स्थानावर असणार आहे. तसेच, या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. जोडीदाराबरोबर तुमचा संवाद चांगला राहील. वाणीत गोडवा दिसून येईल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या कर्म योगात हा राजयोग जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. व्यवसायात तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
हंस आणि केंद्र त्रिकोण राजयोग जुळून आल्याने वृश्चिक राशीच्या लोकांचे लवकरच चांगले दिवस सुरु होतील. या राशीच्या भाग्य स्थानी हा राजयोग जुळून येणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्ही परदेशात देखील जाण्याचे योग जुळून येणार आहेत. समाजात तुमची प्रतिमा चागंली दिसून येईल. तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. मित्रांची साथ तुम्हाला लाभेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)














