Rahu Transit 2026: 2026 वर्षाचा सध्या 5 वा म्हणजेच मे महिना सुरू आहे. हे वर्ष अनेकांसाठी गेमचेंजर ठरत आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षात अनेकांचे नशीब पालटणार आहे, कारण या वर्षात अनेक मोठ-मोठ्या ग्रहांचे संक्रमण होतंय. ज्याचा परिणाम 12 राशींवर होताना दिसणार आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब फळफळेल, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्योतिषींच्या मते, 2026 वर्षाच्या अखेरीस होणारे राहूचे संक्रमण 4 राशींचे भाग्य बदलेल. ज्यामुळे 2027 वर्षात या लोकांची आर्थिक स्थिती, करिअर, व्यवसायात लाभ मिळेल.
2026 वर्षाच्या अखेरीस होणारे राहूचे संक्रमण 4 राशींचे भाग्य बदलेल...(Rahu Transit 2026)
ज्योतिषींच्या मते, विविध ग्रहांचे, म्हणजेच नक्षत्र आणि राशी बदलण्याचे, राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम होतात. आता, 2026 च्या अखेरीस राहू आपली राशी बदलणार आहे. यामुळे अनेक राशींना फायदा होईल. राहू कुंभ राशीतून मकर राशीत संक्रमण करणार आहे. शनि हा मकर राशीचा स्वामी आहे. याच मकर राशीत राहूच्या प्रवेशाचा 4 राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल. राहूचे संक्रमण शनिवार, 5 डिसेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:28 वाजता होईल. हे संक्रमण 4 राशींसाठी शुभ काळ घेऊन येईल. मकर राशीत राहूचे संक्रमण झाल्यावर कोणत्या राशी भाग्यवान ठरतील, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी राहूचे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. राहूच्या संक्रमणाचा प्रभाव तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देईल. नात्यांमधील तणाव संपुष्टात येईल. तुम्ही प्रवासाला जाऊ शकता, जे तुमच्यासाठी शुभ ठरेल.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांना राहूच्या संक्रमणामुळे भाग्याची साथ मिळेल. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्हाला जीवनात संघर्ष करावा लागू शकतो. उत्पन्नातील वाढीमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुम्ही परदेश प्रवासाची योजना आखू शकता. जर तुम्ही परदेशात नोकरी करण्याचा विचार करत असाल, तर राहूच्या संक्रमणानंतरचा काळ तुमच्यासाठी चांगला असेल.
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार वृश्चिक राशीच्या लोकांना राहूच्या संक्रमणाच्या प्रभावाचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची संधी मिळेल. तुमची प्रगती होईल. राहूच्या संक्रमणामुळे तुमचा खर्च वाढू शकतो. तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामे पूर्ण होतील. जर तुम्ही वाहन किंवा जमीन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ते सत्यात उतरू शकते. खर्च जास्त असू शकतो, त्यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घ्यावे लागतील. तुमच्यासाठी काळ पूर्वीपेक्षा चांगला असेल.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस...5 राशींच्या संपत्तीचा वेग डबल..भरभराट दुप्पट..! पॉवरफुल भद्र राजयोग, मे च्या शेवटी कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
