Rahu Nakshatra Parivartan : 2025 वर्षाच्या शेवटी पापी ग्रह राहूच्या चालीत होणार बदल; 'या' राशींचे सुरु होतील 'अच्छे दिन', धनलाभाचे मिळतील संकेत
Rahu Nakshatra Parivartan 2025 : नोव्हेंबर महिन्यात राहू ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ फार लाभदायक ठरु शकतो.

Rahu Nakshatra Parivartan 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहू ग्रहाला (Rahu Gochar) कठोर वाणी, यात्रा, चोरी, दुष्ट कर्म आणि त्वचारोगाचा कारक ग्रह मानतात. त्याचबरोबर राहू ग्रह ठराविक वेळेनुसार नक्षत्र परिवर्तन करतात. याचा प्रभाव मानवासह संपूर्ण देशभरात पडतो. माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात राहू ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्राचा स्वामी ग्रह राहू आहे. त्यामुळे राहूचं या नक्षत्रात प्रवेश करणं काही राशींसाठी फार लाभदायक ठरु शकतं. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
राहू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन मकर राशीसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात प्रगती दिसून येईल. उत्पन्नाचे अनेक नवीन मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तसेच, करिअरच्या चांगल्या टप्प्यावर तुम्ही पोहोचाल. तसेच, नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. त्याचबरोबर या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी राहू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात राहू ग्रहामुळे तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. करिअरमध्ये उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी राहू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन फार लाभदायक ठरणार आहे. कारण राहू ग्रह या राशीच्या कर्म भावात संक्रमण करणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक झालेलं दिसेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाची नवी साधनं तुमच्यासाठी उपलब्ध होतील. परदेशात यात्रेला जाण्याचे योग जुळून येतील. तसेच, मित्रांचं सहकार्य तुम्हाला मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :














