Rahu Ketu Transit 2026: राहू-केतू यांचे नाव जरी काढले, तरी अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. कारण ज्योतिषशास्त्रात त्यांना अशुभ ग्रह म्हटले जातात. मात्र हेच दोन ग्रह 2026 नवीन वर्षात काही लोकांच्या जीवनात अगदी शुभ लाभ मिळवून देणार आहेत. नवीन वर्षात राहू आणि केतूचे राशी बदल खूप महत्वाचे मानले जातात. ज्योतिषींच्या मते, राहू-केतू नवीन वर्षात आपले मार्ग बदलतील, ज्यामुळे चार राशी श्रीमंतीच्या वाटेवर असतील. चांगले उत्त्पन्न मिळवतील. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...

2026 मध्ये राहू -केतूचे राशी बदल अत्यंत महत्वाचे...(Rahu Ketu Transit 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये राहू आणि केतूचे राशी बदल खूप महत्वाचे मानले जातात. ५ डिसेंबर २०२६ रोजी राहू मकर राशीत प्रवेश करेल, तर केतू कर्क राशीत प्रवेश करेल. या दोन अशुभग्रहांचेभ्रमणचारराशींचेभाग्यउजळवेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया त्या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत..

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये राहू आणि केतूचे भ्रमण अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी ओळख मिळेल. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. राहू-केतूसंक्रमणानंतरनोकरीबदलण्याची शक्यता आहे.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026कन्या राशीच्या लोकांसाठी राहू-केतू संक्रमण अत्यंत शुभ ठरेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता असेल. तुम्हाला व्यवसायातही लक्षणीय प्रगती मिळेल. तुम्हाला परदेशात नोकरी देखील मिळू शकते. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षणीयरीत्या मजबूत होईल. तुम्ही नवीन लोकांशी संपर्क साधाल, ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीला महत्त्वपूर्ण फायदा होईल.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026राहु-केतू संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी उत्कृष्ट ठरेल. नवीन वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुमचे नशीब अचानक बदलेल आणि तुम्ही तुमच्या कारकिर्दीत प्रगती करू शकाल. व्यवसायात भरीव नफा मिळेल. या काळात प्रलंबित प्रकल्प देखील पूर्ण होऊ लागतील. मालमत्ता खरेदी करण्याच्या शुभ संधी देखील निर्माण होतील. घरी काही शुभ घटना घडू शकतात.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026मीन राशीसाठी हे ग्रह संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. तुम्ही नवीन उपक्रम सुरू करू शकता आणि परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते आणि तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.

हेही वाचा

January 2026 Monthly Horoscope: काऊंटडाऊन सुरू! जानेवारी 2026 मध्ये 5 राशींचं नशीबानं दार ठोठावलंच, कसा जाणार संपूर्ण महिना? पैसा..नोकरी..प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)