Continues below advertisement


Rahu Ketu Nakshatra Parivartan : ज्योतिष शास्त्रानुसार, राहू-केतूच (Rahu Ketu Gochar) ग्रहाचं संक्रमण सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. तर, राहू-केतूचं नक्षत्र परिवर्तनाला सुद्धा तितकंच महत्त्व देण्यात आलं आहे. राहू आणि केतू ग्रहाला ज्योतिष शास्त्रात सावली आणि पापी ग्रह मानतात. हे दोनच असे ग्रह आहेत जे नेहमीच उलटी चाल चालतात.


पंचांगानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 रोजी राहु-केतू ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार आहे. म्हणजेच राहू ग्रह पूर्व भाद्रपद नक्षत्रातून निघून शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तसेच, केतू पूर्व फाल्गुनी नक्षत्राच्या तृतीय चरणातू न द्वितीय चरणात प्रवेश करणार आहे.


राहू-केतू ग्रह 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी आपल्या चालीत परिवर्तन करतील. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, या दोघांच्या बदलत्या चालीचा सरळ परिणाम देशभरात होणार आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.


तूळ रास (Libra Horoscope)


राहू-केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभकारक असणार आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. धनलाभाचे अत्यंत शुभ योग जुळून येतील. तसेच, नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.


धनु रास (Saggitarius Horoscope)


राहू-केतूचं नक्षत्र परिवर्तन धनु राशीसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. उत्पन्नाचे नवे सोर्स तुमच्यासमोर उपलब्ध होतील. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला संसार कराल. नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. एकूणच घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.


मकर रास (Capricorn Horoscope)


राहू-केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा परिणाम मकर राशीवर पडणार आहे. या काळात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, पदोन्नतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी मोकळे होतील. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. महत्त्वाची आणि जबाबदारीची कामे लवकर पार पडतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Budh Gochar 2025 : दु:ख, संकट आणि आर्थिक नुकसान...बुध ग्रहाच्या संक्रमणाने 'या' राशी संकटाच्या भोवऱ्यात, 10 नोव्हेंबरपासून मिळणार अलर्ट