Rahu Ketu Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहू (Rahu) आणि केतू (Ketu) ग्रहाला मायावी ग्रह म्हणतात. जिथे राहू ग्रहाला माया, भौतिक इच्छा, भ्रम आणि अचानक घडणाऱ्या घटनांचा कारक ग्रह मानतात. तिथे केतू ग्रहाला आध्यात्मिकता, मोक्ष, त्याग आणि वैराग्याचा कारक ग्रह मानला जातो. अशा वेळी दोन ग्रहांच्या स्थितीतील बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर तसेच, जगभरात पाहायला मिळतो.
राहू आणि केतू ग्रह एका ठराविक कालावधीनंतर एकत्र नक्षत्र परिवर्तनसुद्धा करतात. येत्या 23 नोव्हेंबर रोजी दोन्ही ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. यावेळी राहू ग्रह शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, केतू ग्रह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहू आणि केतू ग्रहाच्या स्थितीतील बदलाचा परिणाम तीन राशींवर होणार आहे. त्यामुळे या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, मायावी ग्रह राहू येत्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, याच दिवशी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी केतू ग्रह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहू ग्रह सध्या कुंभ आणि सिंह राशीत केतू ग्रह विराजमान आहेत.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या कुंडलीत दहाव्या स्थानी राहू आणि दुसऱ्या चरणात केतू विराजमान आहे. या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तसेच, तुमच्या मनातील एखादी इच्छादेखील पूर्ण होईल. तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. तसेच, जे लोक टेक्नोलॉजी, मीडियाशी संबंधित क्षेत्रात काम करतायत त्यांना चांगले परिणाम पाहायला मिळतील. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
या राशीच्या तिसऱ्या चरणात केतू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या राशीसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्यात साहस आणि पराक्रम दिसून येईल. तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. तसेच, धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल. भावा-बहिणींमधील संबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लग्न भावात राहू आणि सप्तम भावात केतू ग्रह विराजमान आहे. या काळात प्रत्येक कार्यात तुमचा सहभाग महत्त्वाचा असेल. अनेक गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे साध्य करता येतील. भौतिक सुख-समृद्धीचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, समाजात तुमची प्रतिष्ठा टिकून राहील. तुमची लोकप्रियता वाढलेली दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :