Rahu Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या स्थितीनुसार मे महिना फार खास असणार आहे. कारण या महिन्यात गुरु ग्रह बृहस्पतीने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. आता लवकरच पापी ग्रह राहूचा मीन राशीतून निघून कुंभ राशीत प्रवेश होणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, छाया ग्रह राहू 18 मे 2025 रोजी म्हणजेच आज संध्याकाळी 4.30 वाजता संक्रमण करणार आहे. राहूच्या कुंभ राशीत प्रवेश केल्याने काही राशींच्या लोकांना बंपर लाभ मिळणार आहे. तर, काही राशींना या काळात सावध राहण्याची गरज आहे. राहूच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
मकर रास (Capricorn Horoscope)
राहू राशी परिवर्तन करुन कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मकर राशीच्या धन भावात हा ग्रह असणार आहे. तसेच, राहूची दृष्टी सहाव्या आणि सातव्या भावात देखील असणार आहे. नुकतीच मकर राशीची साडेसाती संपली आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. या राशीच्या लोकांना चांगला धनलाभ मिळेल. तसेच, उत्पन्नात चांगली वाढ होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, परदेशात जाण्याचे योग लवकरच जुळून येणार आहेत.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या तिसऱ्या चरणात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्ही पूर्ण करु शकता. तसेच, एकमेकांतील वाद मिटतील. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. समाजात तुम्हाला मान- सन्मान देखील मिळेल. या कालावधीत राहूमुळे तुमच्या ज्ञान, बुद्धी आणि कलात्मकतेला चांगला वाव मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या सहाव्या चरणात हे संक्रमण होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्या लवकर संपतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. नोकरीत प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :