Rahu Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, राहूला पापी ग्रह मानतात. राहू (Rahu Gochar) ग्रह एका राशीत जवळपास 18 महिन्यांपर्यंत स्थित असतो. माहितीसाठी 18 मे 2025 रोजी राहूने शनिच्या कुंभ राशीत प्रवेश केला होता. आता 10 सप्टेंबर 2025 रोजी म्हणजेच आज राहू ग्रह वृद्धावस्थेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. राहूच्या संक्रमणामुळे आतापर्यंत अनेक राशींचं नुकसान झालं आहे. मात्र, या राशी संक्रमणामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वैदिक शास्त्रानुसार, आज म्हणजेच 10 सप्टेंबर 2025 पर्यंत राहू ग्रहाने 30 ते 24 अंशांपर्यंत सीमा पार केली आहे. पुढे हळुहळू एक एक सीमा पार करुन राहू ग्रह 18 अंशापर्यंत पोहोचणार आहे. या दरम्यान राहू युवावास्थेत प्रवेश करणार आहे. हा काळ तुमच्या प्रगतीचा असणार आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या राहू धन भावात विराजमान आहे. या राशीच्या सहाव्या, आठव्या आणि दहाव्या चरणात दृष्टी पाडणार आहे. या राशीच्या लोकांना लाभाबरोबरच आर्थिक संकटही ओढावण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंदी असणार आहे. या काळात कोणताही शॉर्टकट घेऊ नका. तसेच, तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. मित्रांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. त्याचबरोबर संपत्तीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध होतील. 

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

या राशीच्या कुंडलीत राहू तिसऱ्या चरणात विराजमान आहे. तसेच, या काळात तुम्हाला सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात कोर्ट कचेरीच्या बाबतीत थोडं सावध राहा. नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळू शकते. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. नवीन गोष्टींचा लाभ घेण्यास तुम्ही सक्षम असाल. धनसंपत्तीत भरभराट होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लग्न भावात राहू ग्रह विराजमान आहे. युवावस्थेत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी तुम्ही आत्मसात करु शकता. तसेच, तुमच्या कुंडलीतील राहूची स्थिती चांगली असल्यामुळे या काळात तुमची महत्त्वाकांक्षा दिसून येईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज संकष्ट चतुर्थीला वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 'या' 5 राशींना अचानक होणार धनलाभ, प्रगतीचे संकेत देणार बाप्पा