Grah Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो.  मार्च महिना ग्रह- नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. होळीनंतर शुक्र ग्रह आपले स्थान बदलणार आहे. शुक्र ग्रह मीन राशीत परविर्तन करणार आहे. ज्या मीन राशीत शुक्र प्रवेश करणार हे तिथे राहू विरजमान आहे. तब्बल 18 वर्षानंतर शुक्र आणि राहुची युती (Rahu and Shukra Conjunction)  होत आहे. या युतीचा लाभ होणार असून तीन राशींचे भाग्य उजळणर आहे. शुक्र आणि राहुच्या युतीमुळे कोणत्या राशीचा फायदा होणार यविषयी जाणून घेऊया


वृषभ राशी (Aries)  


शुक्र आणि राहुची युती ही वृषभ राशीसाठी हा अतिशय शुभ आणि लाभदायक असणार आह.या युतीमुळे मोठा लाभ होणार असून संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. नशीबाची साथ मिळाल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळणार आहे.  


धनु राशी  (Sagittarius)


शुक्र आणि राहुच्या युती धनु राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी घेऊन येणार आहे. वाहन किंवा मालमत्तेची खरेदी होण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना पदे मिळण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढीचा लाभ मिळू शकतो.


कुंभ राशी (Aquarius)


 दीर्घकाळ चाललेला आर्थिक प्रश्न सुटू शकतो.नोकरी करणऱ्यांसाठी ही युती फलदायी असणार आहे.  कुंभ राशीच्या लोकांना रखडलेल्या कामात यश मिळू शकते.


31 मार्च रोजी मालव्य योग


 राशी परिवर्तनामुळे अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात. असाच एक शुभ राजयोग हा मालव्य योग आहे. हा योग पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो.या योगाच्या निर्मितीमुळे लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येते. या आठवड्यात म्हणजे 31 मार्च रोजी असाच एक राजयोग जुळून येत आहे.  धन, भौतिक सुख आणि ऐश्वर्य यांचा दाता असलेला शुक्र ग्रह  कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या मीन राशीत प्रवेशामुळे मालव्य राजयोग तयार होईल. मिथुन, कन्या, धनु राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हे ही वाचा :


Malavya Rajyog 2024: 31 मार्चला धनाचा दाता शुक्र बनवत आहे शक्तिशाली मालव्य योग, 'या' तीन राशींना मिळणार बक्कळ पैसा