Astrology 10 January 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, पुत्रदा एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, म्हणजेच 10 जानेवारीपासून (Putrada Ekadashi 2025) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. पौष पुत्रदा एकादशी ही 2025 वर्षातील पहिली एकादशी आहे. या एकादशीला अत्यंत दुर्मिळ संयोग घडत आहे. या दिवशी ब्रह्मयोग (Bramha Yog) तयार होत आहे. ही एकादशी तिथी काही राशींसाठी चांगले दिवस घेऊन येत आहे. या राशींचं नशीब 10 जानेवारीपासून सोन्यासारखं उजळेल आणि त्यांना सर्व सुख प्राप्त होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी पौष पुत्रदा एकादशी खूप शुभ ठरणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. करिअरच्या क्षेत्रात चांगले बदल दिसून येतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. भाऊ-बहिणींचंही सहकार्य मिळेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. या काळात मेष राशीच्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची तब्येत सुधारेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. तसेच भगवान विष्णूच्या कृपेने सर्व वाईट गोष्टी दूर होतील.
तूळ रास (Libra)
तूळ राशीच्या लोकांसाठी ही एकादशी तिथी खूप आनंद देणारी ठरेल. या काळात तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले बदल पाहायला मिळतील. तुम्हाला पालकांचं सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकतं. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होईल. परदेश व्यापारात विस्तार होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घरात सुख-शांति नांदेल आणि घराचा विकास होईल.
मीन रास (Pisces)
एकादशी तिथी मीन राशीच्या लोकांसाठी आनंदाची पहाट घेऊन येत आहे. या काळात तुम्ही केलेल्या सर्व योजना यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला फायदा होईल. तब्येत सुधारेल. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवता येतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकतं. एकूणच 10 जानेवारीपासून तुमचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Shani Gochar 2025 : अखेर प्रतिक्षा संपली! 29 मार्चला शनि राशी बदलणार; 3 राशींचं भाग्य उजळणार