Propose Day 2025 Wishes In Marathi: 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. या क्रमाने आज 8 फेब्रुवारी म्हणजेच प्रपोज डे आहे. या दिवशी लोक त्यांच्या भावना व्यक्त करतात. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि आजपर्यंत तुम्ही तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करू शकत नसाल, तर आजचा दिवस खास आहे, जेव्हा तुम्ही बोलू शकता. त्याचबरोबर प्रेम व्यक्त करायचं असेल, तर एखाद्या काव्यात्मक शैलीत असेल तर अनेक गोष्टीही सुटू शकतात. या दिवशी तुमच्या आवडत्या व्यक्तीला हटके शुभेच्छा द्या! टॉप 10 सुंदर मेसेज पाठवून तुमचं प्रेम व्यक्त करा...

प्रपोज डेच्या हटके शुभेच्छा द्या... 

व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या खास व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करतात. पण काही लोक त्यांच्या खास व्यक्तीला प्रपोज करायला घाबरतात. अशा परिस्थितीत, आपण त्याला प्रपोज डेच्या शुभेच्छा देण्यासाठी इथे देण्यात आलेले मेसेज, कोट्स आणि कविता पाठवू शकता...

मी कालही तुझ्यावर प्रेम केले, आजही मी तुझ्यावर प्रेम करतोउद्याही तुझ्यावर प्रेम करेन. मी कायम तुझ्यासोबत राहण्यासाठी उत्सुक आहे, तुला काय वाटतं? प्रपोज डे च्या शुभेच्छा!

समुद्राचं किनाऱ्याशी…ढगांचं आभाळाशी…मातीचे जमिनीशी..तसंच अतुट नाते आहे…माझे केवळ तुझ्याशीच…हॅप्पी प्रपोज डे !

महागडे गिफ्ट नको मलातुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाचहोकार असेल तरतुझा हात दे माझ्या हातातहॅप्पी प्रपोज डे !

ज्या दिवसापासून मी तुला पहिल्यांदा भेटलोत्या दिवसापासून तू माझी Soulmate आहेसमाझ्या आयुष्यात आल्याबद्दल..आणि ते सुंदर बनवल्याबद्दल धन्यवाद. प्रपोज डे च्या शुभेच्छा!

तुझ्यावर प्रेम केल्याने मी एक चांगला व्यक्ती होतोय. मला संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबरच जगायचे आहेतुझ्याबरोबरच म्हातारे व्हायचे आहे. प्रपोज डे च्या शुभेच्छा!

ना मला तुला गमवायचं आहे,ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,देशील का मला कायम साथ?राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बातहॅप्पी प्रपोज डे !

तुला माझ्यातील अपूर्णता आणि असुरक्षितता दिसलीतरीही तू माझ्यासोबत उत्तम जुळवून घेतेस, मला समजून घेतेस, आयुष्यभरासाठी अशीच तुझी साथ हवीये, देशील ना?प्रपोज डे च्या शुभेच्छा!

चंद्रास साथ जशी चांदण्यांचीतशी साथ तू मला देशील का?जीवनाच्या या सुंदर प्रवासाततुझा हात हाती देशील का?हॅप्पी प्रपोज डे !

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत करेन…हॅप्पी प्रपोज डे !

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातलारंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातलाहॅप्पी प्रपोज डे !

बंध जुळले असता मनाच नातही जुळायला हवं अगदी स्पर्शातून ही सार कळायला हवंहॅप्पी प्रपोज डे !

स्वप्न आहेस माझे तू,सत्यात कधी उतरशील.जितकं प्रेम तुझ्यावर करते मी,तितकं प्रेम माझ्यावर कधी करशील?हॅप्पी प्रपोज डे !

तू माझ्या आयुष्यातील संगीत आहेस. तुझे हसणे हे सिम्फनीसारखे आहेजे मला कायम हवेहवेसे वाटते. माझ्या आयुष्यातील संगीतालातुझे सूर लाभतील का गं? प्रपोज डे च्या शुभेच्छा!

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'ला बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यायचंय? 'हे' गिफ्ट ठरतील बेस्ट पर्याय 

(टीप : ही बातमी एबीपी माझा प्रेक्षक आणि वाचकांना माहिती म्हणून देत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. गुंतवणुकीचा कोणताही पर्याय निवडताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, त्यानंतरच योग्य पर्याय निवडा.)