Premanand Maharaj : वृंदावनच्या प्रेमानंद महाराजांची (Premanand Maharaj) ख्याती संपूर्ण जगभरात पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. याच कारणामुळे त्यांच्या प्रवचनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त येतात. सामान्य व्यक्तीं व्यतिरिक्त ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक लोक वृंदावन येथे प्रेमानंद महाराजांपुढे नतमस्तक होतात. अशा वेळी अनेकजण महाराजांना काही प्रश्न विचारतात. काही प्रश्न ऐकून तर खुद्द प्रेमानंद महाराजांनाच हसू येतं. नुकताच असाच एक प्रश्न एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारला. 

Continues below advertisement

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारलं की, मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. अनेकदा महत्त्वाचं काम असूनही आम्हाला सुट्टी मिळत नाही. पण, जर आजी, काकी किंवा कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या मृत्यूचं खोटं कारण सांगितलं तर मात्र लगेच सुट्टी मिळते. 

भक्ताच्या प्रश्नावर प्रेमानंद महाराजांचं उत्तर

व्यक्तीने पुढे सांगितलं की, ऑफिसमध्ये खरं सांगून सुट्टी मागितली तर कधीच मिळत नाही. पण, खोटं सांगून सुट्टी मागितली तर लगेच मिळते. भक्ताच्या याच प्रश्नाला जोडून दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, जर प्रत्येक दीड महिन्यांनी वृंदावनला येण्यासाठी सुट्टी मागितली तर ती कधीच मिळणार नाही. मी आजही ऑफिसमध्ये खोटं कारण देऊन आलो आहे. तर, खोटं कारण देऊन सुट्टी घेणं पाप आहे का? 

Continues below advertisement

भक्ताच्या या प्रश्नाला उत्तर देत असताना प्रेमानंद महाराज हसले आणि म्हणाले की, हा कलियुगाचा प्रभाव आहे. खोटं घेणं आणि खोटं देणं, खोटं खाणं आणि खोटं पचवणं. पण, काहीही असो खोटं बोलणं हे पापच आहे. याविषयी सविस्तर सांगताना प्रेमानंद महाराजांनी एक श्लोक सांगितला. सांच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, जांके हृदय ताप है. तांके हृदय आप."  याचा अर्थ खरेपणाशिवाय कोणतीच मोठी तपस्या नाही आणि खोटं बोलण्यासमान कोणतं पाप नाही. ज्याच्या मनात खरेपणा आहे. त्याच्याच मनात देव वसतो. 

प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, आपल्याला प्रत्येक समस्येशी लढता आलं पाहिजे. तसेच, नेहमी सत्याच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खोटं बोलावं. तसं पाहिलं तर, भजन, कीर्तन आणि देवाच्या प्राप्तीसाठी खोटं बोलणं पाप नसतं. जर देवाच्या नावावर तुम्ही जर खोटं बोलत असाल तर ते पाप नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :     

Shani Sade Sati 2026 : नवीन वर्षात 'या' 3 राशींवर असणार शनिच्या साडेसातीचं सावट; लाभ मिळणार की आर्थिक संकट ओढावणार?