Pitru Paksha 2025 : वैदिक पंचांगानुसार, ठराविक वेळेनुसार, सूर्य आणि ग्रहण पडतात. याचा प्रभाव मानवासह जागतिक पातळीवर दिसून येतो. यंदा पितृ पक्षाची (Pitru Paksha) सुरुवात 7 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे. तर, 21 सप्टेंबर 2025 रोजी पितृ पक्ष संपणार आहे. तर, चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 रोजी लागणार आहे सूर्य ग्रहण (Solas Eclipse) 21 सप्टेंबर रोजी लागणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, उत्पन्नाचे अनेक सोर्स तुमच्यासाठी उपलब्ध होतील. नवीन योजनांच्या माध्यमातून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. सामाजिक कार्यात तुमचा विकास झालेला दिसेल. तसेच, या काळात समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सूर्य आणि चंद्र ग्रहणामुळे वृषभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, गुंतवणूक करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता. नोकरदार वर्गातील लोकांच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी चंद्र आणि सूर्य ग्रहण फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, या काळात तुमच्या मनातील इखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)