Continues below advertisement


Pitru Paksha 2025: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याला अखेर सुरूवात झाली आहे. या सोबतच पितृपक्ष पंधरवड्याला देखील सुरूवात झालीय. पंचांगानुसार, या वर्षी पितृपक्ष 7 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 21 सप्टेंबर रोजी संपेल. या दिवसांत पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्यात येते. ज्योतिषशास्त्रशास्त्रानुसार हा काळ अत्यंत खास आहे, कारण पितृपक्षादरम्यान गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल...


पितृपक्षात जबरदस्त गजकेसरी राजयोग बनतोय!


ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र 14 सप्टेंबर रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे, जिथे गुरु आधीच विराजमान आहे. अशात, गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होईल. ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. यासोबतच, या राशींसाठी अचानक धनलाभ आणि भाग्य वाढण्याची शक्यता असते. त्याच वेळी, मन आनंदी राहील. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत


तूळ


ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग या राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण हा राजयोग तुमच्या भाग्य स्थानावर रचला जाणार आहे. त्यामुळे या काळात तुमचे भाग्य चमकू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. सामाजिक कार्यात तुमची ओळख वाढेल. तसेच, यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्याचबरोबर, शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. तुमचा कुटुंब आणि मित्रांसोबत चांगला वेळ जाईल आणि प्रेमसंबंधांमध्येही गोडवा येईल.


मिथुन


ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी सकारात्मक ठरू शकतो. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, या काळात तुम्हाला आदर मिळेल. त्याचबरोबर प्रतिष्ठा वाढेल. तसेच, वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. अभ्यास करणाऱ्यांना चांगले मार्गदर्शन आणि निकाल मिळतील. आरोग्य देखील चांगले राहील, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक कामात उत्साही असाल. या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.


कन्या


ज्योतिषशास्त्रानुसार, गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कामाच्या ठिकाणी तयार होणार आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. यावेळी नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. त्याच वेळी, व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. या काळात तुम्ही तुमच्या स्पर्धकांपेक्षा पुढे असाल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. तुमच्या संभाषणाने लोक प्रभावित होतील. तसेच, या काळात मोठा व्यवसाय करार होऊ शकतो. जो भविष्यात फायदेशीर ठरू शकतो.


हेही वाचा :           


Weekly Horoscope: अखेर सप्टेंबरचा नवा आठवडा सुरू! पितृपक्षाचा काळ 'या' 4 राशींसाठी टेन्शनचा? मेष ते मीन 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)