Pithori Amavasya 2025 : हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला फार महत्त्व आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी स्नान दान आणि पितरांचं श्राद्ध-तर्पण करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, या दिवशी पितरांचं श्राद्ध आणि तर्पण केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. त्याचबरोबर, पितरांचा आशीर्वाद आणि सुख-शांतीही प्राप्त होते. यंदा 22 ऑगस्ट 2025 रोजी पिठोरी अमावस्या साजरी होणार आहे. या दिवशीची तिथी आणि स्नान दानाचा शुभ मुहूर्त नेमका काय असणार आहे ते जाणून घेऊयात. 

पिठोरी अमावस्या तिथी 2025 (Pithori Amavasya Tithi 2025)

वैदिक पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला ही अमावस्या साजरी करतात. त्यानुसार, यंदा 22 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 11 वाजून 57 मिनिटांनी ही तिथी सुरु होईल. तर, 23 ऑगस्ट 2025 रोजी 11 वाजून 37 मिनिटांनी ही तिथी पूर्ण होणार आहेत. उदय तिथीनुसार, 23 ऑगस्ट रोजी पिठोरी अमावस्या असणार आहे. 

'हा' उपाय करा 

पिठोरी अमावस्येच्या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. पण, जर तुम्हाला गंगा किनारी जाणं शक्य नसेल तर, घरातच तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगा जल घालू शकता. आंघोळ केल्यानंतर पुरुष पांढऱ्या रंगाचे शुभ्र कपडे घालून पितरांचं तर्पण किंवा श्राद्ध करावं. तसेच, त्यांच्या नावाने भोजन द्यावे. या दिवशी भरगाव शंकराच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. 

पिठोरी अमावस्येचं महत्त्व (Importance Of Pithori Amavasya)

पौराणिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अमावस्येची कथा ऐकवली होती. धार्मिक मान्यतेनुसार, पिठोरी अमावस्येच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होते. या दिवशी गरजूंना भोजन दान करावं. तसेच, झाडाखाली दिवा लावून त्याची परिक्रमा करावी. यामुळे जीवनात शांती टिकून राहते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                                    

Astrology : गुरुपुष्य योग, लक्ष्मी-नारायण योग आणि बरंच काही...21 ऑगस्टचा दिवस 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली; पैशांचा पडणार धो-धो पाऊस