Pisces Horoscope Today 30 April 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात (Business) तुमचा कोणताही निष्काळजीपणा आज तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे काळजी घ्या. लक्षपूर्वक काम करा. तुमच्या आरोग्याबाबत (Health) अधिक काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज संध्याकाळी स्वत:ला वेळ देण्यासाठी घराबाहेर पडा. पण, तुम्ही एकटे असलात तरी तुमचं मन शांत नसणार. मनात असंख्य विचार सुरु असतील. नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालकांना खूप आनंद होईल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसेही आज तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला संध्याकाळी तुमचा फार जवळचा मित्र भेटू शकतो. त्याच्याबरोबर तुम्ही तुमचे सुख-दु:ख शेअर करू शकता. त्यामुळे तुम्हाला खूप दिवसांनी प्रसन्न वाटेल.
कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने अनुकूल नाही. जर तुम्हाला कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून कर्ज घ्यायचे असेल तर वेळ अनुकूल नाही. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल आणि कुटुंबातील वातावरणही आज चांगले राहील. नवीन योजनांवर काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आज तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज संपत्तीतही वाढ होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल.
आजचे मीन राशीचे आरोग्य
मीन राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु हंगामी आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे.
मीन राशीसाठी आजचे उपाय
कपाळावर पिवळे तिलक लावून हळदीचे दूध सेवन केल्यास खूप फायदा होईल.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :