Pisces Horoscope Today 17 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना काही नवीन विषयात त्यांची आवड निर्माण होईल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल तर तुम्हाला त्याचाही पूर्ण फायदा मिळेल. तुमचे रखडलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करत असलेल्या योजनांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे करा. तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. देवाप्रती तुमची भक्ती वाढेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल.
मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांना आज नशिबाची साथ मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज पूर्ण फायदा होताना दिसत आहे. मात्र, गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला नाही. गुंतवणुकीचा विचार करत असाल तर काही काळ थांबा. कारण, आजचा दिवस गुंतवणुकीच्या बाबतीत तुमच्या बाजूने दिसत नाही. आज तुम्ही धार्मिक स्थळाच्या प्रवासासाठी पैसे खर्च करू शकता. नोकरी (Job) व्यवसायातील नोकरदारांवर कामाचा जास्त बोजा राहील.
मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. सर्व सदस्य विनोद करताना दिसतील आणि एकमेकांना मदत करतानाही दिसतील. कुटुंबासोबत सहलीला जाण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करू शकाल.
आज मीन राशीचे आरोग्य
आज तुम्हाला सांधेदुखीच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. दिर्घकालीन आजार असल्या कारणाने वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
मीन राशीसाठी आजचे उपाय
आजच्या दिवशी विष्णु सहस्त्रनामाच्या पाठाचे पठण करा. नक्कीच फायदा होईल.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :