Panchgrahi Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 अनेक दुर्लभ योगांनी जुळून आलं आहे. याचं कारण म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच लक्ष्मी नारायण, बुधादित्य योगापासून (Yog)अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर जानेवारी महिन्यात अनेक शक्तिशाली राजयोग (Rajyog)निर्माण होणार आहेत. यामुळे काही राशींच्या लोकांना शुभ फळ मिळेल.
वैदिक ज्योतिश शास्त्रानुसार, नवग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. अशातच जानेवारी महिन्यात मकर राशीत ग्रहांचा संयोग जुळून येणार आहे. यामुळे पंचग्रही योग निर्माण होणार आहे. हा योग तीन राशींसाठी फार खास असणार आहे. तर या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मकर राशीत सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्राची युती होणार आहे. यामुळे पंचग्रगी योग निर्माण होणार आहे. 13 जानेवारी रोजी शुक्र, 16 जानेवारीला मंगळ, 24 जानेवारीला बुध, 14 जानेवारीला सूर्य आणि 18 जानेवारीला चंद्रसुद्धा मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे 24 जानेवारी 2026 रोजी पंचग्रही राजयोग निर्माण होणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी पंचग्रही योग तुमचं भाग्य उजळवणारा आहे. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना देखील लवकरच प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल. अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, तुमच्या पगारात वाढ होईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी पंचग्रही योग अनेक अर्थांनी अनुकूल असणार आहे. या राशीच्या अकाराव्या चरणात हा योग जुळून येणार आहे. तसेच, तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अचानक लाभ मिळू शकतो. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कोणताही व्यवहार करताना नीट विचार करुन करा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी पंचग्रही योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, अनेक क्षेत्रातून तुम्हाला यश मिळू शकतं. आरोग्याच्या बाबतीत देखील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक राहील. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लवकरच लग्नाचे प्रस्ताव येतील. घरात शांतीचं वातावरण राहील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
