PanchanK Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक मोठ मोठ्या ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे. तसेच, वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक शुभ राजयोग निर्माण होणार आहेत. नवग्रहांमध्ये शनिला (Shani Dev) सर्वात प्रभावशाली ग्रह मानतात.सध्या शनि मीन राशीत विराजमान आहे या राशी शनि जून 2027 पर्यंत स्थित असणार आहेत. त्यामुळे या काळात शनिची कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती होते किंवा दृष्टी पडते. त्याचप्रमाणे येणाऱ्या नवीन वर्षात शनी सूर्य ग्रहाबरोबर संयोग करुन पंचांक योग (Panchank Yog) निर्माण करणार आहे. यामुळे काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वैदिक शास्त्रानुसार, 4 जानेवारी 2026 रोजी रात्री 11 वाजून 38 मिनिटांनी सूर्य आणि शनि ग्रह एकमेकांच्या 72 डिग्री अंशावर असतील. यामुळे पंचांक योग निर्माण होणार आहे. या काळात कर्मफळदाता शनि मीन राशीत आणि सूर्य ग्रह धनु राशीत संक्रमण करणार आहे. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

या राशीसाठी शनी-सूर्याचा पंचांक योग फार शुभकारक ठरणार आहे. या राशीच्या लग्न भावात सूर्य आणि शनि चौथ्या भावात असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसेल. तसेच, व्यवसायात चांगला लाभ मिळेल. 

Continues below advertisement

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी शनि-सूर्याचा पंचांक योग अनेक अर्थाने खास असणार आहे. या काळात शनि तिसऱ्या चरणात आणि सूर्य बाराव्या चरणात असणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फार अनुकूल असेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. तसेच, भविष्यासाठी पैशांची गुंतवणूक फायदेशीर ठरेल. या काळात तुमचं ध्येयावर पूर्ण लक्ष असेल. वैयक्तिक आयुष्यात तुमची प्रगती होईल. तसेच, अनेक नवी नाती निर्माण होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या लग्न भावात शनि आणि अकराव्या स्थानी सूर्य विराजमान आहे. करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळेल. हाती घेतलेली कार्य वेळेत पूर्ण होतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, तुम्ही सतत ऊर्जावाल फील कराल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Horoscope Today 6 December 2025 : आज शनिवारच्या दिवशी 7 राशींवर असणार शनिदेवाची कृपा, पापांतून मुक्ती आणि कष्टाचं फळ देणार शनिदेव; आजचे राशीभविष्य