Continues below advertisement

Panchank Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बृहस्पती म्हणजेच गुरु (Jupiter) ग्रहाला देवतांचा गुरु मानण्यात आलं आहे. अशातच गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. सध्या गुरु ग्रह बृहस्पती ग्रह अतिचारी चाल चालणार आहेत. यामुळे यंदा बृहस्पती 2 राशीत प्रवेश करणार आहेत. सध्या गुरु मिथुन राशीत विराजमान आहे.

येत्या 18 ऑक्टोबर 2025 पासून 5 डिसेंबर 2025 पर्यंत गुरु ग्रह कर्क राशीतच विराजमान असणार आहे. गुरुचे कर्क राशीत प्रवेश केल्याने शुक्र ग्रहाबरोबर युती होणार आहे. तसेच, यामुळे दंशांक नावाचा योग जुळून येणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 3 वाजून 21 मिनिटांनी गुरु-शुक्र ग्रह एकमेकांच्या 72 डिग्रीवर असतील. यामुळे पंचांक योग निर्माण होणार आहे. सध्या शुक्र ग्रह कन्या राशीत विराजमान आहे. शुक्र आपल्या नीच राशीत विराजमान आहे. यामुळे हंस राजयोग, केंद्र त्रिकोण राजयोगसुद्धा निर्माण होणार आहे.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी गुरु-शुक्र पंचांक योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी, वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्ही करु शकता. तुमच्या कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, शारीरिक आणि मानसिक तणाव कमी होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी गुरु-शुक्राचा पंचांग योग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. व्यवसायाचा देखील विस्तार झालेला दिसेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करु शकता.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी पंचांक योग फार लाभदायी ठरणार आहे. गुरु ग्रह या राशीच्या उच्च स्थानी सप्तम चरणात विराजमान आहे. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात चांगला आनंद पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुमच्या निर्णय क्षमतेत चांगली वाढ झालेली दिसेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा : 

Horoscope Today 15 October 2025 : आज बुधवारच्या दिवशी या 5 राशींवर प्रसन्न होणार लाडका बाप्पा; समोर आलेलं विघ्न टळेल, वेळोवेळी मिळतील संकेत, आजचे राशीभविष्य