Numerology : हिंदू धर्म मान्यतेनुसार, सर्व देव देवतांमध्ये भगवान शंकराला महादेवाची उपाधी देण्यात आली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 1 पासून ते 9 पर्यंत अनेक असे मूलांक आहेत. या दरम्यान जन्मलेल्या महिलांवर भगवान शंकराची विशेष कृपा असते. तसेच, आत्मिक संबंध असतो. या महिला भगवान शंकराशी संबंधित गुण दर्शवतात. या स्त्रियांमध्ये वैराग्य, दृढता, न्याय, अंतर्ज्ञान आणि बुद्धीचा समावेश आहे. हे मूलांक (Mulank)कोणते ते जाणून घेऊयात. 

भगवान शंकराशी यांचा थेट संबंध - 7, 16 आणि 25

अंकशास्त्रीय मान्यतेनुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या महिलांचा मूलांक 7 असतो. या जन्मतारखेला जन्मलेल्या महिला पूर्व जन्माच्या ज्ञानाशी परिपक्व आत्मा मानतात. या महिला सहज प्रवृत्तीच्या असतात. तसेच, ध्यान, मौन, गूढ ज्ञानाला त्या आकर्षित होतात. या जन्मतारखेच्या महिलांना आध्यात्माच्या मार्गावर चालायला आवडते. 

8, 17 आणि 26 - स्वामी ग्रह शनि 

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह शनि आहे. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांचा कार्मिक अंक असतो. आयुष्याच्या सुरुवातीलाच यांना जबाबदारी, कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. 

9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वामी ग्रह मंगळ 

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. हा ग्रह साहसाचा प्रतीक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, याला आध्यात्मिक योद्धा सुद्धा म्हटलं गेलं आहे. 

दृढ इच्छाशक्ती आणि ध्येयवादी - 1, 10, 19 आणि 28

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 1 असतो. याचा स्वामी ग्रह सूर्य आहे. हा चेतनेचा प्रतीक आहे. आध्यात्मिक प्रभावाने हे लोक आंतरिक संघर्षाशी संबंधित असतात. 

हे ही वाचा :                                                                                                                                              

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Nakshatra Parivartan 2026 : अक्षय्य तृतीयेच्या आधी शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशी ठरतील लकी, सुवर्णकाळ लवकरच सुरू