Numerology Today 23 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांचं मन आज प्रसन्न राहील. नोकरीत यश मिळेल. आज नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत लाभेल. तुम्हाला मानसिक शांति मिळेल. आज तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसून येईल. कामात भावंडांची मदत मिळेल. आज तुम्हाला धनलाभाचे संकेत आहेत.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 च्या लोकांचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आज तुमची एखाद्या राजकीय नेत्याशी भेट होऊ शकते. घरात धार्मिक कार्य निघू शकतात. तुमचा आजचा दिवस खर्चिक असेल. आज तुमच्या वाणीत मधुरता असेल. कुटुंबाची जबाबदारी वाढू शकते. कुटुंबातील एखाद्या प्रौढ व्यक्तीकडून पैसे मिळू शकतात.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 च्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला कामात एखाद्या मित्राची मदत मिळेल. प्रत्येक कामात कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आज तुमचं मन प्रसन्न राहील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 चा आजचा दिवस आनंदी जाईल. नोकरी-व्यवसायासाठी दिवस अनुकूल असेल. मित्रांची मदत मिळेल. वरिष्ठ आज तुमच्या कामावर खुश होतील. मेहनतीने केलेल्या कामाचा चांगला परिणाम पाहायला मिळेल. तुम्ही नवीन योजनांवर काम करू शकता. प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमची ओळख होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबासोबत तु्म्ही कुठेतरी फिरायला जाऊ शकता. तुमचं आरोग्य सामान्य राहील.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 चा आजचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. आज नोकरी-व्यवसायासाठी दिवस अनुकूल नसेल. आज नवीन योजनांवर काम सुरू करू नका. नीट सुरू असलेल्या कामांत अडथळे येतील. व्यवसायात जास्त नफा मिळणार नाही. कुटुंबात एखादी समस्या निर्माण होईल. वाणीत गोडवा ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं आरोग्य बिघडू शकतं.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 च्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. नोकरी-व्यवसायासाठी दिवस अनुकूल नसेल. आज तुमच्यावर कामाचा ताण जास्त असेल. व्यवसायात अपेक्षित यश मिळणार नाही. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. हवामानातील बदलामुळे तुम्ही आजारी पडू शकता.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 साठी देखील आजचा दिवस प्रतिकूल असेल. आज तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमचं मन विचलित असेल, तुमच्या मनात अनेक विचार येतील, कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. व्यवसायात तुम्हाला मित्रांचं सहकार्य मिळेल. कुटुंबात वातावरण चांगलं असेल.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 साठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. आज नोकरीत तुम्हाला सहकाऱ्यांचं सहकार्य लाभेल, वरिष्ठांकडून देखील मदत मिळेल. भावनेच्या भरात महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेऊ नका. आज मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. मूलांक 9 च्या लोकांनी नोकरी-व्यवसायात सावध राहून काम करावं. आज जोखिमीचे निर्णय घेऊ नका. व्यवसायात आज जास्त लाभ मिळणार नाही. कुटुंबात एखाद्या गोष्टींवरुन वाद निर्माण होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. वाहन चालवताना आज काळजी घ्यावी, अन्यथा अपघात होऊ शकतो.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांनी नोकरी-व्यवसायात सावध राहून काम करावं. आज जोखिमीचे निर्णय घेऊ नका. व्यवसायात आज जास्त लाभ मिळणार नाही. कुटुंबात एखाद्या गोष्टींवरुन वाद निर्माण होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. वाहन चालवताना आज काळजी घ्यावी, अन्यथा अपघात होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :