Numerology Today 15 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 साठी आजचा दिवस थोडा व्यस्त असेल. आज तुमची आर्थिक स्थिती ढासळेल, पैशांचे व्यवहार तुम्हाला अत्यंत जबाबदारीने हाताळावे लागतील. पोषक आहार घ्यावा. सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा, तुमची मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी व्यायाम करा. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहा.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 साठी आजचा दिवस फार जोखिमीने भरलेला असेल. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर वर्क प्रेशर जास्त असेल. आज सर्व निर्णय विचारपूर्वक घ्या. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहा. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. काम करताना अधूनमधून ब्रेक घेत राहा.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 च्या लोकांच्या लव्ह लाईफमध्ये आज बरेच बदल पाहायला मिळतील. मुलांच्या आरोग्यावर आज लक्ष द्या. तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा मजबूत असेल. आज तुम्ही डान्स क्लास किंवा जिम लावण्याचा निर्णय घेतला पाहिजे. लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असणाऱ्या जोडप्यांनी जोडीदारासोबत वेळ घालवण्याचे नवीन मार्ग शोधले पाहिजे.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 च्या लोकांना आज कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल. विवाहित जोडप्यांनी आज वादापासून दूर राहा. ताणतणाव कमी करण्यासाठी आज तुम्ही स्किन केअरकडे लक्ष देऊ शकता. कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवला तर तुमचा ताण दूर होईल, तुम्हाला सुखाचे क्षण अनुभवायला मिळतील. कामावर फोकस करुन तुम्ही तुमचं पर्सनल लाईफ देखील सांभाळलं पाहिजे.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 च्या लोकांसाठी आजचा दिवस शांतिचा असेल. करिअरमध्ये आज तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील, ज्या तुमच्या प्रमोशनचं देखील कारण बनू शकतात. आज तुमचं आरोग्य थोडं बिघडू शकतं. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. बाहेरचं खाणं टाळा. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 च्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला असेल. आज तुम्हाला तुमच्या क्रशसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज तुम्ही एखादी चांगली गुंतवणूक करू शकता, ज्यातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल. कामाशी संबंधित प्रवास होऊ शकतो. बाहेरचं खाणं टाळा.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 च्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानीचा असेल, पैशाचे व्यवहार करताना काळजी घ्या. आज तुम्ही अचानक बदलाचा स्वीकार करावा. ताणतणाव टाळण्यासाठी तुमचे छंद जोपासा, त्यासाठी वेळ द्या. सिंगल लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. रिलेशनमध्ये असलेल्यांनी किंवा विवाहितांनी समस्यांतून बाहेर येण्यासाठी आपल्या जोडीदाराची मदत घ्यावी.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकता. ऑफिसमध्ये आज कामाचा जास्त ताण जाणवेल. जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांनी थोडा धीर धरावा.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांना आज स्वत:वर लक्ष द्यावं. जोडीदारासोबत वेळ घालवावा. लवकर तुम्हाला एखादी खुशखबर मिळू शकते. आज दिवसभर स्वत:ला हायड्रेटेड ठेवा. आज तुम्ही पॉझिटीव्ह असाल. जोडीदारासोबत रोमँटिक डिनर प्लॅन करा. जंक फूडपासून दूर राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :