Numerology Today 12 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस चांगला राहील. आज आर्थिक लाभाची विशेष शक्यता आहे आणि तुम्ही मित्रासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात प्रगती होताना दिसेल. आज समाजात तुमचे नाव आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील आणि तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध चांगले राहतील.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस मध्यम फलदायी राहील. आज कुटुंबातील कुणाशीही कठोर शब्दांत बोलू नका. पैशांबाबत काही समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमची चलबिचल दिसेल. व्यापारी आणि व्यावसायिकांनी आज सावधगिरीने काम करावे, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कौटुंबिक जीवन सामान्य राहील.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस सामान्य असेल. आज तुम्ही लोकांना कोणत्याही प्रकारचे सल्ले देणे टाळावे, अन्यथा शेवटी तुम्ही चुकीचे सिद्ध होऊ शकता. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज खूप मेहनत करावी लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना आज सहकाऱ्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस चढ-उतारांचा असेल. आज तुम्हाला काही कारणांमुळे अचानक दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे घाई टाळा आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. आज कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला काही विशेष निर्णय घ्यायचा असेल तर तो पुढे ढकला. जर तुम्ही घरी काही पूजा आयोजित केली तर ते खूप फायदेशीर राहील.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. आज मूलांक 5 असणाऱ्यांना नशीब साथ देईल. तुम्ही जो काही विचार केला असेल तो आज पूर्ण होईल, ज्यामुळे तुमच्या खांद्यावरचे ओझे हलके होईल. बरेच दिवस अडकलेले पैसे आज अचानक तुम्हाला मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना आज चांगले आर्थिक लाभ मिळतील आणि कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी कराल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखाल.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस शुभ राहील. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करतील, ज्यामुळे तुम्हाला चांगली बढती मिळेल. व्यावसायिकांना आज चांगले आर्थिक लाभ मिळतील आणि त्यांच्या व्यवसायात प्रगती होईल. कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल आणि भावंडांशी चांगले संबंध राहतील.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. कामात काही अडथळे येतील, ज्यामुळे तुम्ही नाराज होऊ शकता. आज वाहन जपून चालवा, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. तुमचा येणारा पैसा अचानक कुठेतरी अडकू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद वाढू शकतात, त्यामुळे धीर धरा आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस शुभ राहील. आज घरात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होतील. वडिलांच्या मदतीने तुम्ही नवीन वाहन किंवा जमीन खरेदी करू शकता. नोकरदार लोक आज पैसे कमवण्याचे इतर मार्ग शोधतील. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे चांगले संबंध राहतील आणि नात्यातील गैरसमज दूर होतील.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस चांगला राहील. तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल, ज्यामुळे तुम्ही अपूर्ण कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. आज तुम्ही अशा शुभ कार्याबद्दल विचार करू शकता, जे तुम्हाला खूप दिवसांपासून करायचे होते. आज घरात आनंदाचे वातावरण राहील आणि विशेष पाहुणे येण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांना आज त्यांच्या लव्ह पार्टनरकडून काही खास भेट मिळू शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Horoscope Today 12 February 2024 : आजचा सोमवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या