Numerology Today 11 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.
मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.
आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.
मूलांक 1
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल आणि तुम्ही रविवारच्या सुट्टीचा पूर्ण आनंद घ्याल. तुम्ही बोलताना नम्रतेने वागा, अन्यथा कोणाशी तरी अनावश्यक वाद होईल. आज एखाद्या ग्राहकामुळे व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन सामान्य राहील.
मूलांक 2
कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. मूलांक 2 चे लोक आज खूप आनंदी राहतील, कारण आज त्यांना इच्छित धनलाभ होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न ठरू शकते. भाऊ आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्ही तुमच्या पालकांना भेटवस्तू देऊ शकता, ज्यामुळे तुमचे नाते आणखी मजबूत होईल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल.
मूलांक 3
कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 च्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज धार्मिक कार्यात तुमचा रस वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही शुभ कार्याची योजना देखील करू शकता. आज तुम्ही दिलेला सल्ला एखाद्यासाठी खूप प्रभावी ठरेल. उदरनिर्वाहाच्या इतर मार्गाचाही तुम्ही विचार करू शकता आणि त्यासाठी योजनाही कराल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगले राहील.
मूलांक 4
कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असेल. आज एखादी चांगली बातमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. तुम्ही परदेशातील काही व्यावसायिक कल्पना करू शकता, ज्या भविष्यात सिद्धही होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. व्यापार क्षेत्रात आज व्यापारी जे काही काम करतील ते पूर्णपणे फलदायी ठरेल.
मूलांक 5
कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मूलांक 5 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. रविवारच्या दिवशी आज तुम्ही तुमच्या भावंडांसोबत बसून अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्याल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत खूप जागरूक असाल, ज्यामुळे तुमच्या जीवनशैलीत चांगले बदल होतील. नोकरदार लोक आज आपली सर्व कामे आनंदाने पूर्ण करतील.
मूलांक 6
कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. आज तुमच्या जोडीदारासोबत तुमचे काही मुद्द्यावर वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे मानसिक तणाव निर्माण होईल. आज व्यावसायिकांना दिवसभर कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल, ज्यामध्ये ते अडकून राहतील. आज गाडी जपून चालवा आणि घाई टाळा. तुमचे आईसोबत काही मुद्द्यावर वैचारिक मतभेद होऊ शकतात.
मूलांक 7
कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे शब्द तुमच्या मनाला लागतील, ज्यामुळे तुम्ही थोडे भावूक व्हाल. आज व्यावसायिकांना आर्थिक नुकसान होण्याची भीती भेडसावेल. आज तुम्हाला आरोग्याची समस्या उद्भवेल.
मूलांक 8
कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उताराचा असेल. आज कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुम्हाला भौतिक सुखांमध्ये वाढ जाणवेल, यासोबत मानसिक तणावही वाढेल. कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता असल्यास काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही नातेवाईकाशी पैशाची देवाणघेवाण टाळा, अन्यथा पैसे अडकून नातेसंबंध बिघडू शकतात.
मूलांक 9
कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. मूलांक 9 च्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा चालू असलेले काम बिघडू शकते. प्रत्येक गोष्टीवर स्पष्टपणे बोलण्याची तुमची सवय तुम्हाला महागात पडू शकते. आज तुम्ही काही आवडीचे कपडे खरेदी करण्यासाठी जाऊ शकता. आज तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यावर मतभेद होण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :