Numerology : पैशांनी नेहमीच भरलेली असते यांची तिजोरी; पण स्वभावाने असतात पक्के रागीष्ट, अंकशास्त्रात म्हटलंय...
Numerology Of Mulank 9 : अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.

Numerology Of Mulank 9 : ज्याप्रमाणे, ज्योतिष शास्त्रात राशींनुसार व्यक्तीचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात (Ank Shastra) सांगितल्याप्रमाणे, व्यक्तीचा स्वभाव, त्यांची आवड-निवड कळते. याच्या माध्यमातून व्यक्तीचं लक्षण, चरित्र, नातेसंबंध आणि करिअरच्या बाबतीत माहिती मिळते. आज आपण मूलांक 9 चं व्यक्तिमत्व कसं असतं हे जाणून घेणार आहोत.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.
मूलांक 9 असणाऱ्या लोकांना चेष्टामस्करी करायला फार आवडते. त्यामुळे मित्र परिवारामध्ये हे लोक फार लोकप्रिय असतात. मात्र, मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्या कारणाने या जन्मतारखेच्या लोकांना पटकन राग येतो. आणि कोणत्याही गोष्टीवरुन हे लोक पटकन नाराज होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, या जन्मतारखेच्या लोकांना खेळणे, पोलीस किंवा आर्मीत सेवा करण्याची आवड असते. आपल्या करिअरमध्ये सुरुवातीला यांना फार मेहनत घ्यावी लागते.
लव्ह लाईफ कशी असते?
या जन्मतारखेच्या लोकांच्या लव्ह लाईफबदद्ल बोलायचं झाल्यास, यांची लव्ह लाईफ फार चांगली नसते. यामुळेच यांच्यामध्ये राग आणि द्वेष निर्माण होतो. नात्यात दुरावा निर्माण होतो.
पैशांची कमतरता नसते
या जन्मतारखेच्या लोकांमध्ये पैशांची कमतरता नसते. पैशांनी नेहमीच यांची तिजोरी भरलेली असते. तसेच, हे लोक करिअरमध्ये देखील चांगली प्रगती करतात.
फार आत्मनिर्भर असतात
मूलांक 9 असणारे लोक फार आत्मनिर्भर असतात. आपलं करिअर घडवण्यासाठी किंवा आपल्या उज्वल भविष्यासाठी हे लोक कधीच कोणावर निर्भर नसतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















