Numerology Of Mulank 8 : अंकशास्त्रात (Ank Shastra) मूलांक 1 ते 9 चं वर्णन करण्यात आलं आहे. तसेच, या मूलांकावर (Mulank) कोणत्या ना कोणत्या ग्रहांचं वर्चस्व असते. ज्याप्रमाणे, राशीनुसार, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो. त्याचप्रमाणे, मूलांकावरुन देखील व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवड-निवड कळते. या ठिकाणी आपण मूलांक 8 विषयी जाणून घेणार आहोत.
ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, मूलांक 8 चा स्वामी ग्रह शनीआहे. त्यानुसार, कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 असणारे लोक फार कर्मठ आणि मेहनती स्वभावाचे असतात. यांची आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.
कामाच्या प्रती असतात महत्त्वाकांक्षी
ज्या लोकांचा मूलांक 8 आहे ते लोक फार महत्त्वाकांक्षी स्वभावाचे असतात. या लोकांना आपलं काम वेळेत पूर्ण करायला आवडते. तसेच, आपल्या कामाच्या बाबतीत त्यांना निष्काळजीपणा केलेला अजिबात आवडत नाही. तसेच, हे लोक फार मेहनती असतात. आणि आपल्या तत्वांशी कधीच तडजोड करत नाहीत.
कोणाच्याच बंधनात राहत नाहीत
या जन्मतारखेच्या लोकांना आपल्या वस्तू आपल्या पद्धतीने मॅनेज करायला आवडतात. यांना कोणाच्याही बंधनात राहायला आवडत नाही. तसेच, भौतिकता आणि आध्यात्मिकता यांच्यात समतोल राखायला यांना आवडतं. हे लोक कोणाच्याच दबावाखाली काम करु शकत नाहीत. तसं त्यांना आवडतही नाही. आपल्या कामाच्या प्रती शिस्त यांना आधीपासूनच असते. या जन्मतारखेचे लोक जितके शिस्तीचे असतात तिततकेच आपल्या जोडीदाराप्रती फार प्रेमळही असतात.
दूरदर्शी विचाराचे असतात
आपल्या मेहनतीच्या जोरावर हे लोक आयुष्यात पुढे जातात आणि श्रीमंत होतात. यांना कोणतंही काम करताना नियोजन आखणं फार महत्त्वाचं वाटतं. तसेच, या जन्मतारखेचे लोक खोटं बोलत नाहीत आणि कोणाचं खोटं बोलणं खपवूनही घेत नाहीत. यांना जाणूनबुझून कोणाशी नडायला आवडत नाही. पण, जर कोण यांच्या वाकड्यात गेला तर त्यांना मात्र हे सोडत नाहीत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: