Numerology of Mulank 6 : ज्योतिष शास्त्राप्रमाणेच, व्यक्तीच्या जन्मतारखेला देखील विशेष महत्त्व आहे. कारण अंकशास्त्राच्या आधारे व्यक्तीचा मूलांक काढला जातो. आणि मूलांकाच्या आधारे आपण एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अंदाज लावतो. जसे की, व्यक्तीचा स्वभाव, लव्ह लाईफ, करिअर इ. आज आपण अशा मूलांकाबाबत जाणून घेणार आहोत जे फार रहस्यमयी असतात. त्यांच्या मनात काय चाललंय हे अनेकदा कळत नाही.
आज आपण मूलांक 6 च्या संदर्भात जाणून घेणार आहोत. त्यानुसार, ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला झाला आहे त्यांच्या मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. हा ग्रह प्रेम, सौंदर्य आणि धन-संपत्तीचा कारक ग्रह मानतात. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्या कारणाने या जन्मतारखेच्या लोकांना लग्जरी लाईफ जगायला आवडते.
कसा असतो स्वभाव?
या जन्मतारखेच्या लोकांबद्दल बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेचे लोक फार आकर्षक व्यक्तीमत्वाचे असतात. त्याचबरोबर, हे लोक फार प्रामाणिक असतात. तसेच, हे लोक भविष्याच्या संदर्भातील संकल्पना कोणाशीच शेअर करत नाहीत किंवा सांगत नाहीत. त्यामुळे जेव्हा यांना यश मिळतं. तेव्हा यांच्या कामगिरीबद्दल प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसतो.
'या' बाबतीत असतात लकी
या जन्मतारखेच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळते. या लोकांच्या जीवनात कधीच पैशांची कमतरता नसते. हे लोक आपल्या मेहनतीच्या आणि नशिबाच्या जोरावर आयुष्यात खूप प्रगती करतात.
'ही' असते यांची खासियत
मूलांक 6 असणारे लोक नातं पूर्ण प्रामाणिकपणे टिकवतात. सुंदर दिसणाऱ्या गोष्टींकडे हे लोक पटकन आकर्षित होतात. तसेच, यांच्या नकारात्मक गोष्टींबद्दल बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेच्या लोकांना पैशांची बचत करता येत नाही. तसेच, विनाकारण गोष्टींवर हे लोक जास्त पैसे खर्च करतात.
