Numerology of Mulank 5 : ज्योतिष शास्त्रात जसा व्यक्तीच्या राशीनुसार स्वभाव ओळखता येतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात (Ank Shastra)सांगितल्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीची आपली एक खासियत असते. व्यक्तीचं हे वैशिष्ट्य त्याच्या जन्मतारीख, राशी आणि ग्रहांच्या स्थितीवरुन ओळखता येतं. अशाच मूलांकाविषयी (Mulank)आपण जाणून घेणार आहोत. 

मूलांकाचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव दिसून येतो. त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीचा मूलांक हा एका स्वामी ग्रहाशी जोडला जातो. तसेच, आज आपण मूलांक 5 च्या संदर्भात जाणून घेणार आहोत. 

कसा असतो स्वभाव? 

अनेकदा आपण पाहिलं आहे की काही लोक प्रेम एकाशी तर लग्न कुटुंबियांच्या इच्छेनुसार करतात. अशा लोकांमध्ये त्यांचा मूलांक हा कॉमन असतो. आज आपण अशाच मूलांक 5 च्या बाबतीत सविस्तरपणे जाणून घेऊयात. 

अंक ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. जन्मतारखेचे लोक मनाने फार चांगले असतात. पण, या जन्मतारखेच्या लोकांचा एक प्रॉब्लेम असतो ते म्हणजे यांना कोणाला दुखवायला आवडत नाही. त्यामुळेच यांचं अनेकदा नुकसान होतं. जर या लोकांनी आयुष्यात नीट विचारपूर्वक निर्णय घेतले आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतला तर यांना नेहमी यश प्राप्त होईल. 

कोणत्याच बंधनात राहायला आवडत नाही 

या जन्मतारखेच्या लोकांना कोणत्याच बंधनात अडकायला आवडत नाही. तसेच, जर एखादं काम किंवा एखादं नातं यांना जबरदस्तीने निभावायला सांगितलं तर ते यांच्याकडून कधीच शक्य होत नाही. यांना आपल्या मनाप्रमाणे जीवन जगायला आवडतं. जर यांना योग्य वयात योग्य व्यक्ती भेटली तर यांचा आयुष्य सुफळ संपूर्ण होतं.  

आपल्या व्यक्तिमत्त्वाने इतरांना आकर्षित करतात 

मूलांक 5 असणारे लोक स्वभावाने फार जिज्ञासू असतात. यांना नवीन गोष्ट शिकायला फार आवडते. तसेच, या लोकांना आयुष्यात सतत बदल हवा असतो. सतत एकच गोष्ट करणं यांना कधीच जमत नाही किंवा आवडतही नाही. 

मनमिळाऊ आणि आकर्षक पर्सनालिटी 

या जन्मतारखेचे लोक मनमिळाऊ आणि आकर्षक असतात. इतरांना आपल्या बोलण्याने हे सहज प्रभावित करु शकतात. यांना इतरांवर फक्त प्रेम करायला आवडतं. मात्र, लग्न हे घरच्यांच्या पसंतीनेच करणं पसंत करतात. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Surya Nakshatra Parivartan 2026 : मोठ्ठा योग जुळला! सूर्याचं 'ट्रिपल नक्षत्र परिवर्तन'; 'या' राशींवर पडणार पैशांचा धो-धो पाऊस, चालून येणार मोठी संधी