Numerology Of Mulank 4 : वैदिक शास्त्रानुसार, प्रत्येक मूलांकाला (Mulank) वेगळं महत्त्व आहे. ज्याप्रमाणे राशीनुसार व्यक्तीच्या आवडी-निवडी कळतात, स्वभाव कळतो त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, व्यक्तीच्या चांगल्या वाईट सवयींचा अंदाज लावता येतो. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, त्याचा मूलांक ठरतो. त्यानुसार, आज आपण मूलांक 4 च्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 असतो. मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे. राहू ग्रह महत्त्वाकांक्षी, कर्मप्रभाव, आव्हानं, भौतिकवाद आणि ग्रहांशी संबंधित आहे.
कसा असतो स्वभाव?
या जन्मतारखेच्या लोकांचं लग्न उशिराने होतं. यावरुन त्यांना मित्र-मैत्रीणींकडून, नातेवाईकांकडून अनेकदा टोमणेही मिळतात. या जन्मतारखेची मुलं बहुतेक शांत स्वभावाची असतात. या लोकांच्या आयुष्यात खूप स्ट्रगल असतं. पण, भरपूर मेहनत घेतल्यानंतर यांना नक्की यश मिळतं.
विचार आणि स्वभावाने इतरांपेक्षा वेगळे असतात
या जन्मतारखेच्या लोकांचा इतरांपेक्षा फार वेगळा स्वभाव असतो. ज्या गोष्टी इतरांना कळत नाहीत त्या यांना पटकन कळतात.यांचा दृष्टीकोन फार दृढ विचारांचा असतो. तसेच, स्वभावाने हे लोक फार रहस्यमयी स्वभावाचे असतात. अनेकदा यांच्या स्वभावाचा अंदाज लावताच येत नाही.
गूढ विषयात मन रमतं
या जन्मतारखेचे लोक बाहेरुन जरी शांत वाटत असले तरी आतल्या आत हे लोक प्रत्येक गोष्टीचा फार बारकाईने विचार करतात. यांना गूढ विषयांबाबत जाणून घेण्यात फार आनंद मिळतो. जसे की, ज्योतिष, रहस्य, मनोविज्ञान इ.
अभ्यास आणि करिअरमध्ये चढ-उतार
या जन्मतारखेचे लोक तसे चंचल स्वभावाचेही असतात. यांचं मन अनेकदा बदलू शकतं. यांच्यासाठी मिडिया, कॅमेरा, रिसर्च, सायकोलॉजी आणि टेक्निकल फिल्ड चांगले करिअर ऑप्शन्स ठरु शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :