Numerology Of Mulank 3 : ज्याप्रकारे वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या, नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीच्या भविष्याबाबत सांगितलं जातं. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रानुसार, (Ank Shastra) व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेला फार महत्त्व देण्यात आलं आहे. जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचा मूलांक (Mulank) देखील ठरवला जातो. यासाठीच आज आपण मूलांक 3 च्या लोकांबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 चा शासक ग्रह बृहस्पती आहे, जो सर्व ग्रहांचा गुरू मानला जातो. त्यानुसार, या जन्मतारखेचे लोक स्वतंत्र विचाराचे असतात. हवं ते मिळवण्याची जिद्द त्यांच्यात असते. मूलांक 3 शी संबंधित आणखी काही खास गोष्टी जाणून घेऊया.

प्रचंड बुद्धिवादी असतात

अंकशास्त्रानुसार, ज्या लोकांचा मूलांक 3 असतो असे लोक प्रचंड बुद्धिवादी असतात.हे लोक आपल्याच मनाचे धनी असतात. त्यामुळे त्यांना स्वत:चंच म्हणणं खरं करण्याची थोडक्यात ते म्हणतील ती पूर्व दिशा अशा यांचा स्वभाव असतो. त्यामुळे हे लोक इतरांपेक्षा थोडे वेगळे असतात. कमीपणा किंवा माघारपण घेण्याची यांच्यात सवयच नसते. 

प्रचंड हट्टी असतात 

या जन्मतारखेचे लोक फार हट्टी स्वभावाचे असतात. त्यांना एखादी गोष्ट हवी असेल तर ते ती मिळवूनच राहतात. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत यांना शांत बसवत नाही. तसेच, एखादी गोष्ट मिळाली नाही तर हे लोक लगेच अस्वस्थही होतात. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी त्यांना नाही मिळाल्या  नाहीत किंवा घडल्या नाहीत तर त्यांची प्रचंड चिडचिड होते.   

कोणासमोर मान खाली घालायला आवडत नाही

या जन्मतारखेचे लोक फार स्वाभिमानी असतात. यांना लगेच कोणासमोर हार मानायला किंवा कमीपणा घ्यायला आवडत नाही. तसेच, यांना इतरांचे उपकारही नको असतात. यांच्या कामात कोणाचाही हस्तक्षेप आल्यास यांना आवडत नाही. 

आत्मविश्वास कमी असतो 

या जन्मतारखेच्या लोकांचा आत्मविश्वास देखील फार कमी असतो. हे लोक पटकन निर्णय घेत नाहीत. तसेच, हे लोक फार चंचल स्वभावाचे असतात त्यामुळे यांच्या एकाग्रताही फार कमी दिसून येते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:        

Astrology : तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि शनी येणार एका रांगेत; जुळणार 'त्रिग्रही योग', या राशींना मिळणार पुण्याचं फळ